हंसिका मोटवानीचा मिस्ट्री मॅन कोण? डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ

हंसिका मोटवानीचा होणार पती आहे तरी कोण?

हंसिका मोटवानीचा मिस्ट्री मॅन कोण? डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ
Hansika Motwani
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 31, 2022 | 5:05 PM

मुंबई- अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 4 डिसेंबर रोजी हंसिकाचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाच्या दोन दिवस आधीपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. हंसिकाला डेस्टिनेशन वेडिंग करायची इच्छा असल्याने जयपूरमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. या लग्नसोहळ्याला फक्त कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे.

4 डिसेंबर रोजी संध्याकाळी हंसिकाला लग्न पार पडणार आहे. तर त्याच दिवशी सकाळी हळदीचा कार्यक्रम असेल. 2 डिसेंबर रोजी सुफी नाईटचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडेल.

लग्नसोहळ्याच्या आधी कुटुंबीयांसाठी खास पोलो मॅचही आयोजित करण्यात आली आहे. लग्नानंतर कसिनो थीम पार्टीसुद्धा असेल. प्रत्येक कार्यक्रमासाठी ड्रेस कोड आणि थीम निश्चित करण्यात आला आहे.

हंसिकाचं लग्न जयपूरमधील मुंडोटा फोर्ट अँड पॅलेसमध्ये पार पडणार आहे. हंसिका अरेंज मॅरेज करणार अशी चर्चा होती. मात्र तिचं लव्ह मॅरेज असल्याचं कळतंय. हंसिका तिच्या बॉयफ्रेंडशीच लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

मुंबईतील व्यावसायिक सोहैल कठुरियाशी हंसिका लग्न करणार असल्याचं कळतंय. एकमेकांना डेट करण्यापूर्वी हे दोघं मित्र आणि एकाच कंपनीचे पार्टनर होते.

हंसिकाने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. ‘शका लका बुम बुम’ या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.