घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याने ‘ते’ लक्षवेधी फोटो केलेत पोस्ट, म्हणाला…

Hardik Pandya - Natasa Stankovic: घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याने पोस्ट केलेले लक्षवेधी फोटो चर्चेत, फोटो पोस्ट करत क्रिकेटर म्हणाला..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक याने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा...

घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याने ते लक्षवेधी फोटो केलेत पोस्ट, म्हणाला...
| Updated on: Sep 23, 2024 | 8:20 AM

Hardik Pandya – Natasa Stankovic: भारतीय क्रिकेट संघाचा दमदार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नताशा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर दोघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला. घटस्फोटानंतर नताशा मुलाला घेवून तिच्या मायदेशी गेली. अशात घटस्फोटानंतर पहिल्यांदा हार्दिक आणि मुलाची भेट झाली आहे. दोघांच्या भेटीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक पांड्या आणि त्याच्या मुलाची चर्चा रंगली आहे.

घटस्फोटानंतर हार्दिक त्याच्या मुलापासून लांब होता. घटस्फोटानंतर अनेक महिन्यांनी मुलाला भेटल्यानंतर हार्दिकच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. आगस्त्या आणि हार्दिक यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हार्दिक मुलाला कडेवर घेऊन फिरताना दिसत आहे. दोघांसोबत क्रुणाल पांड्या याचा मुलगा देखील आहे.

 

 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, हार्दिक पांड्याने देखील मुलासोबत फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत हार्दिक याने कॅप्शनमध्ये ‘आनंद…’ असं लिहिलं आहे. फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

 

 

हार्दिक आणि नताशा यांचं नातं

कोरोना काळात नताशा आणि हार्दिक यांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. चार वर्षांच्या नात्यात नताशा – हार्दिक यांनी दोन वेळा लग्न केलं. 2020 मध्ये नताशा – हार्दिक यांनी गुपचूप लग्न उरकलं होतं. पण फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर 2023 मध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेने लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

हार्दिकच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाल्याची देखील चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या अभिनेत्री आणि ब्रिटिश सिंगर जास्मिन वालिया हिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. दोघे एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो देखील करतात. पण यावर दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.