
Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाड हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री आणि मॉडेल नताशा हिला घटस्फोट दिल्यानंतर 31 वर्षीय मॉडेल सोबत क्रिकेटपटूचं नाव जोडण्यात येत आहे… एवढंच नाही तर, हार्दिक याने सर्वांसमोर नात्याची कबुली देखील दिली आहे.. सध्या हार्दिक याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामधील एका फोटोमध्ये हार्दिक गर्लफ्रेंडसोबत दिसत आहे…
हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तो आणि महिका पारंपारिक लूकमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. यादरम्यान, हार्दिक मिहिका हिच्या गालावर किस करताना देखील दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दोघेही काही प्रकारची पूजा करताना दिसत आहेत, ज्यावरून असं दिसून येतं की ही क्लिप त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनमधील असू शकते. सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या एका फोटोमध्ये, हार्दिक महिकाला मांडीवर घेऊन आरशात सेल्फी काढताना दिसत आहे.
हार्दिक पांड्या याची पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर, अनेकांनी कमेंट करत संताप देखील व्यक्त केलाय. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कोणाला तरी जळवण्यासाठी पोस्ट केली आहे का?’ तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘नताशा हिचं नुकसान…’ सध्या हार्दिक याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
महिका हिने अर्थशास्त्र आणि फायनान्स या विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगात प्रवेश केला. तिने अनेक म्यूझि व्हिडिओ, सिनेमे आणि तनिष्क, विवो आणि युनिक्लो सारख्या ब्रँडसाठी जाहिरात मोहिमांमध्ये काम केले आहे. तिने मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे आणि तरुण ताहिलियानी यांसारख्या अव्वल भारतीय डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक देखील केला आहे. 2024 मध्ये, महिकाला इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये “मॉडेल ऑफ द इयर” पुरस्कार मिळाला.
हार्दिक पांड्याचा विवाह बॉलिवूड अभिनेत्री स्टॅनकोविकशी झाला होता. दोघांनी मे 2020 मध्ये लग्न केलं आणि फेब्रुवारी 2023 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन विधींनुसार पुनर्विवाह केला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 2024 मध्ये नताशा आणि हार्दिक यांनी घटस्फोटाची घोषणा केली… नताशा आणि हार्दिक यांना अगस्त्य म्हणून एक मुलगा देखील आहे.