घटस्फोटाची चर्चा आणि पत्नीसोबत वाद सुरू असतानाच हार्दिक पांड्या याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, लोकही…

हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिक पांड्याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे.

घटस्फोटाची चर्चा आणि पत्नीसोबत वाद सुरू असतानाच हार्दिक पांड्या याचा तो व्हिडीओ व्हायरल, लोकही...
hardik pandya and natasa stankovic
| Updated on: Jul 14, 2024 | 2:59 PM

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिक पांड्या हा T20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार खेळताना दिसला. संपूर्ण देशभरातून हार्दिक पांड्या याचे काैतुक केले गेले. हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांच्यात वाद सुरू असल्याची एक चर्चा आहे. हेच नाहीतर भारतीये संघाने 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतरही एकही पोस्ट हार्दिक पांड्या याच्या पत्नीने सोशल मीडियावर शेअर केली नाहीये. यामुळे विविध चर्चांना सुरूवात झालीये. दुसरीकडे नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.

नताशा हिने सोशल मीडियावर जिममधील काही व्हिडीओ शेअर केले. या व्हिडीओमध्ये नताशा ही स्वत:लाच हिंमत देताना दिसली. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितले की, नताशा आणि हार्दिक पांड्या याच्यात वाद सुरू आहे. नताशा ही हार्दिक पांड्या याच्यावर चांगलीच नाराज आहे. पुढे या दोघांचे नेमके काय होणार याबद्दल आताच काही सांगणे कठीण आहे.

सतत हार्दिक पांड्या याच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच हार्दिक पांड्या हा अनंत अंबानी याच्या लग्नात चांगलीच धमाल करताना दिसला. हेच नाहीतर आता अनंत अंबानीच्या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये धमाकेदार डान्स करताना हार्दिक पांड्या हा दिसत आहे.

डान्स करून थकल्यानंतर खास पेय पिताना देखील हार्दिक पांड्या हा व्हिडीओमध्ये दिसत आहे. हार्दिक पांड्या हा बॉलिवूड अभिनेत्री आणि चंकी पांडेची लेक अनन्या पांडे हिच्यासोबत डान्स करताना दिसतोय. हार्दिक पांड्या याच्या डान्सचे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हार्दिक पांड्या हा अनंत अंबानीच्या सेरेमनीला देखील भाऊ आणि वहिणीसोबत पोहोचला होता.

अंबानीच्या लग्नातही हार्दिक पांड्या हा नताशा हिच्यासोबत पोहोचला नाही. नताशा ही आपल्या जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलासोबत आणि जिममध्ये घालताना दिसत आहे. नताशा सतत व्हिडीओ शेअर करताना देखील दिसत आहे. हार्दिक पांड्या हा नताशासोबतच्या वादामुळे टेन्शनमध्ये असल्याचे सांगितले जाते होते, मात्र त्याचे हे फोटो पाहून अजिबातच वाटत नाहीये की, तो टेन्शनमध्ये आहे.