Rishabh Pant: ऋषभ पंतला भेटल्याशिवाय राहू शकली नाही उर्वशी; शेअर केला ‘हा’ खास फोटो

अपघाग्रस्त ऋषभ पंतची उर्वशीने घेतली भेट? फोटो पाहून चर्चांना उधाण

Rishabh Pant: ऋषभ पंतला भेटल्याशिवाय राहू शकली नाही उर्वशी; शेअर केला 'हा' खास फोटो
Rishabh Pant and Urvashi RautelaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 7:43 AM

मुंबई: अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंतच्या अपघातानंतर सोशल मीडियावरील तिची आणि तिच्या आईची पोस्ट चर्चेत होती. आता पुन्हा एकदा उर्वशीने असा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे तिने रुग्णालयात असलेल्या ऋषभची भेट घेतल्याची चर्चा होत आहे. उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाचा फोटो पोस्ट केला आहे. याच रुग्णालयात सध्या ऋषभवर उपचार सुरू आहेत.

ऋषभ पंतला देहरादून इथल्या रुग्णालयातून हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आलं आहे. मुंबईत त्याच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यात येणार आहे. ऋषभला 30 डिसेंबरला कार अपघातात दुखापत झाली होती.

उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे. त्यातच आता उर्वशीने रुग्णालयाचा फोटो पोस्ट केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

उर्वशीने कोकिलाबेन रुग्णालयाच्या इमारतीचा फोटो पोस्ट केला आहे. मात्र त्यावर तिने कोणतंच कॅप्शन दिलेलं नाही. उर्वशीने खरंच रुग्णालयात ऋषभची भेट घेतली की प्रसिद्धीसाठी फक्त फोटो पोस्ट केला, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित होत आहे.

ऋषभ पंत दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी तयार असून त्यामुळे तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने बुधवारी दिली. बीसीसीआयने त्याला हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्याचा निर्णय घेतला कारण, कोणत्याही व्यावसायिक विमानातून प्रवास करण्याच्या स्थितीत नव्हता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.