AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिमांचा तिरस्कार आजची फॅशन…, धर्माच्या चेष्टेवरून नसीरुद्दीन शाह यांचे खडेबोल

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह कायम स्वतःचं परखड मत मांडताना दिसतात. आता देखील त्यांनी असे खडेबोल सुनावले आहेत, ज्यामुळे बॉलिवूडची एक बाजू समोर आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

मुस्लिमांचा तिरस्कार आजची फॅशन..., धर्माच्या चेष्टेवरून नसीरुद्दीन शाह यांचे खडेबोल
Naseeruddin Shah
| Updated on: Jun 12, 2026 | 10:08 AM
Share

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी’ सीरिजमुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांकडून देखील सीरिजला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर नसीरुद्दीन शाह एक असे कलाकार आहेत जे स्वतःचे परखड विचार सर्वांसमोर मांडण्यास घाबरत नाही… विषय समाजाचा असला तरी, ते बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तर अनेक सेलिब्रिटी असं कधीच करत नाहीत. नसीरुद्दीन शाह यांनी कायम त्यांचे विचार योग्य प्रकारे सर्वांसमोर ठेवले आहे. आता देखील नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात नसीरुद्दीन शाह यांनी हिंदी सिनेमातील पद्धतींवर संताप व्यक्त करताना दिसले. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह बॉलिवूडमध्ये होणाऱ्या धर्माच्या चेष्टेवर खडेबोल सुनावताना दिसले.

हिंदी सिनेमाने कोणत्या धर्माला सोडलं आहे – नसीरुद्दीन शाह

व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह बोलताना दिसत आहेत, ‘हिंदी सिनेमाने कोणत्या धर्माला सोडलेलं नाही, तुम्ही मला सांगा… स्टीरियोटायपिंगते तर आम्ही मास्टर आहोत… शीख धर्माचा थट्टा, पारशी आणि ख्रिश्चन यांची चेष्टा-मस्करी केली जायची. मुस्लीम कायम प्रमाणिक मित्र असायचा… जो हिरोचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालायचा आणि त्याचा मृत्यू व्हायचा… पण त्याचा मृत्यू हा निश्चित असायचा…’

View this post on Instagram

A post shared by @theindianfeedinfo

पुढे नसीरुद्दीन शाह म्हणाले, ‘दुसऱ्याच्या संकटांवर आनंद व्यक्त करणं, आपलं एक राष्ट्रीय वैशिष्ट्य आहे. स्वतःवर हसायला आपल्याला कधीच येत नाही आणि आपली कोणी थट्टा केली तर, आपल्याला वाईट वाटतं.. पण दुसऱ्याची चेष्टा करताना आपण जराही विचार करत नाही… आपल्या सिनेमांनी या गोष्टींना दुजोरा दिला आहे आणि लोकाना प्रात्साहित केलं आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून सिनेमे बनवत आहोत आणि त्याबद्दल खूप गाजावाजाही करतो; तरीही, आपण सुरुवातीपासून एकाच प्रकारचे सिनेमे बनवत आलो आहोत, याकडे कोणीच लक्ष वेधत नाही. नसीरुद्दीन शाह म्हणतात, ‘एखाद्या विशिष्ट समुदायाची थट्टा-मस्करी करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.’

मुस्लिमांचा तिरस्कार आजची फॅशन – नसीरुद्दीन शाह

एका मुलाखतीत नसीरुद्दीन शाह म्हणालेले, ‘पडद्यावर जे काही दाखवलं जातं, ते फक्त आपल्य भोवती घडत असलेल्या घटनांचं रिफ्लेक्शन असतं… निवडणुकीत मते मिळवण्यासाठी इस्लामद्वेष आणि तत्सम गोष्टींचा गैरवापर केला जात आहे. ही या काळातील अत्यंत चिंताजनक गोष्ट आगे… आजच्या काळात मुस्लिमांचा तिरस्कार करणं फॅशन झाली आहे. सुशिक्षित लोक देखील मुस्लिमांचा द्वेष करतात. सत्ताधारी पक्षांनी मोठ्या हुशारीने लोकांमध्ये हे रुजलं आहे… त्यांनी एक विशिष्ट विचारसरणी प्रस्थापित केली आहे.’, असं देखील नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती