Hema Malini: किती श्रीमंत आहेत हेमा मालिनी? जाणून घ्या ‘ड्रीम गर्ल’च्या रॉयल आयुष्याबद्दल

Hema Malini Special: दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमात दमदार भूमिका बजावत हेमा मालिनी यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर आज हेमा मालिनी रॉयल आयुष्य जगत आहेत, त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊ...

Hema Malini: किती श्रीमंत आहेत हेमा मालिनी? जाणून घ्या ड्रीम गर्लच्या रॉयल आयुष्याबद्दल
फाईल फोटो
| Updated on: Oct 18, 2025 | 11:22 AM

Hema Malini : बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांची आजही चाहत्यांमध्ये तेवढीच क्रेझ आहे. हेमा मालिनी आता 77 वर्षांच्या आहेत. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणी असं म्हणणार नाही त्यांनी सत्तरी ओलांडली आहे. आजही हेमा मालिनी चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. 70 आणि 80 च्या दशकात हेमा मालिनी यांनी फक्त हिंदी सिनेविश्वावर नाही तर, संपूर्ण भारतावर राज्य केलं. आजही त्यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात. हेमा मालिनी यांनी अभिनयातून स्वतःची ओळख निर्माण केली. पण त्यांनी राजकारणात देखील स्वतःचा ठसा उमटवला आहे.

हेमा मालिनी याचे सिनेमे…

1968 मध्ये हिंदी सिनेविश्वात पदार्पण केल्यानंतर हेमा मालिनी यांनी 1970 मध्ये तीन हीट सिनेमे दिले. तुम हसीन मैं जवान’, ‘अभिनेत्री’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ या सिनेमांनी तेव्हा बॉक्स ऑफिस नवे विक्रम रचले. त्यानंतर हेमा मालिनी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. तीन सिनेमे हीट ठरल्यानंतर हेमा मालिनी यांनी ‘सीता और गीता’, ‘शोले, ‘नसीब’, ‘क्रांती’, ‘कर्मा’, ‘धर्मात्मा’, ‘बागबान’, ‘ड्रीम गर्ल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘त्रिशूल’ आणि ‘द बर्निंग ट्रेन’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली.

किती श्रीमंत आहे हेमा मालिनी?

हेमा मालिनी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक संस्मरणीय सिनेमांमध्ये भूमिका साकारली आहे. खूप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासोबतच, अभिनेत्रीने स्वतःच्या कारकिर्दीत भरपूर संपत्तीही कमावली आहे. त्यांची एकूण संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची मालमत्ता 123.6 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले.

सलग 3 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली

हेमा मालिनी यांनी 2004 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर मथुरा येथून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत त्यांनी हीच पद्धत पुन्हा वापरली.

हेमा  मालिनी आणि धर्मेंद्र यांचं लग्न

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना चार मुलं देखील आहे. पण बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना धर्मेंद्र यांच्या आयुष्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांची एन्ट्री झाली आणि  दोघांनी समाजाविरोधात जाऊन लग्न केलं.  धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत.