Hemangi Kavi | “आई – बाबांची प्रायव्हसी पाहिलीये, ते केल्यामुळेच..”; हेमांगी कवीच्या वक्तव्याची चर्चा

| Updated on: Apr 19, 2023 | 11:03 AM

आईवडिलांनी घरात कधीच मुलगा आणि मुलगी असे भेदभाव केले नाहीत, असंही तिने सांगितलं. त्यामुळे मुलींनी अमुक प्रकारचे कपडे घालू नयेत किंवा इतके वाजायच्या आत घरी यावं, अशी बंधनं आमच्यावर कधीच नव्हती, असं हेमांगी पुढे म्हणाली.

Hemangi Kavi | आई - बाबांची प्रायव्हसी पाहिलीये, ते केल्यामुळेच..; हेमांगी कवीच्या वक्तव्याची चर्चा
Hemangi Kavi
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी अनेकदा बोल्ड मानल्या जाणाऱ्या, सहसा मोकळेपणे व्यक्त न होणाऱ्या विषयांवर सोशल मीडियावर दिलखुलास मतं व्यक्त करताना दिसते. तिची ‘बाई.. ब्रा आणि बुब्स’ ही पोस्ट तुफान गाजली होती. त्यावर नेटकऱ्यांनी विविध मतमतांतरे मांडली. या पोस्टमधून तिने एकंदरीत स्त्री आरोग्य, ब्रा आणि पुरुषी मानसिकतेचा चांगलाच समाचार घेतला होता. आता हेमांगीने नुकतीच दिलेली एक मुलाखत चर्चेत आली आहे. प्लॅनेट मराठीच्या ‘त्यानंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये ती विविध विषयांवर बिनधास्तपणे व्यक्त झाली. या मुलाखतीत तिने आई-बाबांच्या प्रायव्हसीबद्दल केलेल्या वक्तव्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाली हेमांगी?

“टायटॅनिक, दयावान यांसारखे चित्रपट आम्ही घरात बसून पाहिले आहेत. किसिंग सीन सुरू झाला की इकडे-तिकडे पाहणं वगैरे असं कधीच झालं नाही. 1993-1994 ची ही गोष्ट आहे. माझ्या मैत्रिणींच्या घरी हे लपवलं जातं हे मला माहीतच नव्हतं. म्हणजे माझे आईवडील खूप शिकलेले होते असं तुम्हाला वाटेल. पण माझी आई सातवी पास आहे आणि ती पण गावची. माझे बाबा एलएलबी आहेत. हे वाईट आहे, हे आता नाही बघायचं असं काहीच नव्हतं. जेव्हा मुलं प्रश्न विचारतील की हे काय आहे, तेव्हा आम्ही बघू असा त्यांचा अप्रोच होता. मला हे सांगायला मला अजिबात लाज वाटणार नाही. आधी सगळेच वन रुम किचनमध्ये राहायचे. आई-बाबांची प्रायव्हसी वगैरे.. हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे अरे बापरे, हे काय चालू आहे असे बालिश प्रश्न आम्हाला पडले नाहीत. ते केल्यामुळेच आम्ही जगात आलोय”, असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

आईवडिलांनी घरात कधीच मुलगा आणि मुलगी असे भेदभाव केले नाहीत, असंही तिने सांगितलं. त्यामुळे मुलींनी अमुक प्रकारचे कपडे घालू नयेत किंवा इतके वाजायच्या आत घरी यावं, अशी बंधनं आमच्यावर कधीच नव्हती, असं हेमांगी पुढे म्हणाली. सोशल मीडियावरील ट्रोलिंगलाही हेमांगी अनेकदा सडेतोड उत्तर देताना दिसते. तिच्या या बिनधास्त स्वभावाचं कौतुक इतर कलाकारांकडूनही होतं.