AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Song Out : कोरोना योद्धा ठरलेल्या सरपंचांना समर्पित, ‘हिरो सरपंच’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलं असून अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केलं आहे.(Hero Sarpancha, New Song out)

Marathi Song Out : कोरोना योद्धा ठरलेल्या सरपंचांना समर्पित, 'हिरो सरपंच' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
| Updated on: Feb 06, 2021 | 5:57 PM
Share

मुंबई : मागील वर्षात भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीनं थैमान घातलं. मात्र 2021 हे नवीन वर्ष आपल्या देशासाठी आनंद घेऊन आलं आणि कोरोना आटोक्यात आला. या महामारीच्या    कठीण काळात अनेक लोकांनी स्वत: पुढे येत आरोग्यदूत म्हणून काम केलं. यात लाखो आजी-माजी सरपंच आणि उपसरपंच यांचासुद्धा समावेश होता. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महामारीदरम्यान काम केलं. त्यांच्या याच कार्याला सन्मानित करण्यासाठी हे गाणे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेनं तयार केलं आहे. ‘हिरो सरपंच’ नावाचं हे गाणं एक वेस्टर्न साँग असून ‘आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी’ असं या गाण्याचे बोल आहेत. चित्रपटातील हिरो हा एका काल्पनिक जीवनाचं प्रतीक आहे, तर गाव आणि गावाच्या विकासाचा खरा शिलेदार आणि खरा हिरो हा सरपंचच आहे. या कठीण काळात हाच आरोग्यदूत असणारा सरपंच हिरो ठरला आहे. नुकताच या गाण्याचा अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय नामदार श्री प्रवीण दरेकर यांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाला.

या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलं असून अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर गाण्याला महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी शब्दबद्ध केलं आहे. या गाण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व आजी माजी सरपंच आणि उपसरपंच यांच्या या महान कार्याला एक सलाम असून यातून सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा देण्याचाही हा एक प्रयत्न आहे.

या गाण्याला संगीत देणारे आणि स्वरबद्ध करणारे अवधूत या गाण्याबद्दल सांगतात, ” हे गाणं माझ्यासाठी खरंच खूप खास गाणं आहे. ह्या गाण्याला संगीत आणि आवाज देणं हे मी माझं भाग्यच समजतो. माझा थेट संबंध गावाशी, गावाच्या मातीशी असल्यामुळे मी समजू शकतो की, सरपंच आणि उपसरपंचाची भूमिका एका गावासाठी किती महत्वपूर्ण आहे. हीच भूमिका या गाण्यातून अतिशय समर्पक शब्दात नवनाथ काकडे यांनी त्यांच्या लेखणीतून उतरवली आहे. सरपंच हा त्या गावासाठी किती महत्वाचा असतो हे मी अनुभवलं आहे, गावाचा विकास हाच त्याचा ध्यास असतो. सामान्य माणसाला सरपंच आणि त्याचं कार्य सोप्या शब्दात सांगणारं हे गाणं आमच्या संपूर्ण टीमकडून महाराष्ट्रातल्या सर्व सरपंच आणि उपसरपंच यांना कृतज्ञता पूर्ण एक भेट आहे.”

तर गायक आदर्श शिंदे सांगतात, ” हे गाणं तर नक्कीच स्पेशल आहे, मात्र ह्या गाण्याच्या निमित्ताने अजून एक स्पेशल गोष्ट घडली आहे, ती म्हणजे मी आणि अवधूत गुप्ते पहिल्यांदाच सोबत एक डुएट गाणे गात आहोत. मी नवनाथ काकडे यांचे मनः पूर्वक धन्यवाद करतो की, इतके सुंदर गाणे त्यानी मला गाण्यासाठी दिले, हे गाणे ऐकल्यावर नक्कीच सर्वांच्या मनात सकारत्मकता आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. त्या गावाचा प्रथम व्यक्ती असणारा हा सरपंच गावासाठी देवदूत  असतो. याच सरपंचाच्या प्रयत्नाने गाव विकासाच्या दिशेने प्रवास सुरु करते. त्यांच्या या प्रवासाला आमच्याकडून या गाण्यातून एक धन्यवाद म्हणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.”

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.