Actress Life : प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हॉटेलच्या खेलीत नेमकं काय घडलं? त्यानंतर तिचं जंगलात डोकं अन् पाण्याच्या टाकीत धड…

Actress Life : मित्रानेच गळा घोटला... 'त्या' दिवशी प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हॉटेलच्या खोलीत नेमकं काय घडलं? अभिनेत्रीचं जंगलात डोकं अन् पाण्याच्या टाकीत धड..., गडगंज श्रीमंत होती अभिनेत्री...

Actress Life : प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हॉटेलच्या खेलीत नेमकं काय घडलं? त्यानंतर तिचं जंगलात डोकं अन् पाण्याच्या टाकीत धड...
| Updated on: May 16, 2026 | 1:51 PM

Actress Life : झगमगत्या विश्वात अशा काही धक्कादायक घटना घडल्या आहे, ज्यावर विश्वास ठेवणं खरंच फार कठीण आहे. इंडस्ट्रीमध्ये कोणावर विश्वास ठेवणं फार कठीण आहे. कधी कोण काय करेल काहीही सांगता येत नाही. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडलं आहे. जिने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत ‘हिरोईन’ सिनेमात काम केलं. अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःची ओखळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. पण या दरम्यान अभिनेत्रीकडून एक चूक झाली आणि सर्वकाही संपलं… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मिनाक्षी थापर आहे… मिनाक्षी हिने मित्रावर विश्वास ठेवला आणि त्यानेच तिचा गळा घोटला.

मिनाक्षी हिने करियरची सुरुवात केली. एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मिनाक्षी हिची ओळख ज्यूनियर आर्टिस्ट अमित जैस्वाल याच्यासोबत मैत्री झाली. एकाच सेटवर काम करत असल्यामुळे दोघांमध्ये असेलला संवाद देखील वाढला. यामध्ये अभिनेत्री तिच्या कुटुंबियांबद्दल सर्वकाही अमित याला सांगितलं… माझे कुटुंबिय गडगंज श्रीमंत आहेत… असं मिनाक्षी हिने मित्राला सांगितलं…

मिनाक्षी श्रीमंत घरातील आहे, हे कळ्यानंतर अमित याचा खरा स्वभाव समोर आले. त्याने गर्लफ्रेंड प्रिती हिच्यासोबत अभिनेत्री विरोधात एक कट रचला आणि तिचा शेवट केला.. रिपोर्टनुसार, अमित आणि त्याची गर्लफ्रेंड प्रिती यांनी मिळून मिनाक्षी हिची हत्या केली…

मिळालेल्या माहितीनुसार, अमित याने सर्वात आधी मिनाक्षी हिचं अपहरण केलं आणि तिच्या कुटुंबियांकडून तब्बल 15 लाख रुपयांची खंडणी मागितली… त्याने अभिनेत्रीच्या आईला धमकी दिली की, ‘मला पैसे दिले नाही तर, मिनाक्षी हिला वाईट कामात ढकलेल…’

धक्कादायत सत्य म्हणजे. गोरखपूर येथील एका हॉटेलमध्ये अरोपींनी मिनाक्षी हिचा गळा दाबला, त्यानंतर तिचा जिवे मारण्यात आलं. अभिनेत्रीचा धड पाण्याच्या टाकीत टाकला आणि मुंबईला जात असताना तिचं डोकं बसमधून बाहेर एका जंगलात फेकलं. पोलिसांनी मिनाक्षीच्या फोनचे सिम कार्ड शोधून काढलं आणि गुन्हेगारांना पकडलं.

अखेर तपासात अमित आणि प्रिती यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला… न्यायाधीशांनी त्यांना खून आणि खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मिनाक्षी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारली. पण स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचा मृत्यू झाला. 19 एप्रिल 2012 रोजी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

Follow Us