अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला हायकोर्टाचा झटका, सेल्स टॅक्स नोटीसीविरोधातले अपिल फेटाळले

| Updated on: Mar 30, 2023 | 8:04 PM

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का हीचा विक्रीकर विभागाच्या विरोधात नोटीसी विरोधात हायकोर्टात दाद मागण्याचा प्रयत्न वाया गेला आहे, आता तिला अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागावी लागणार आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला हायकोर्टाचा झटका, सेल्स टॅक्स नोटीसीविरोधातले अपिल फेटाळले
anushka sharma
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कर चुकविल्या बद्दल महाराष्ट्र सेल्स टॅक्स डिपार्टमेंटने बजावलेल्या नोटीसीला आव्हान देणारी अनुष्का शर्मा यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अभिनेत्रीने आता या प्रकरणात अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागावी असे आदेश देत न्यायालयाने चार आठवड्याचा वेळ दिला आहे. स्टेज परफॉर्ममधून कॉपीराईट कायद्यातून शर्मा यांना कमाई होत असल्याने विक्री कर विभागाने ही नोटीस बजावली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. नितीन जामदार आणि न्या. अभय आहूजा यांच्या खंडपीठाने याचिका कर्त्याकडे थेट हायकोर्टात येण्याऐवजी अपिलीय अधिकाऱ्याकडे जाण्याचा पर्याय शिल्लक आहे. परंतू शर्मा यांनी तेथे अपिल केले नाही, आणि त्या सरळ हायकोर्टात आल्या आहेत. त्यांनी आधी अपिलीय प्राधिकरणाकडे दाद मागायला हवी असे न्यायालयाने स्पष्ठ केले आहे. सेल्स टॅक्स डिपार्टमेंटने अभिनेत्रीची याचिका फेटाळण्याची मागणी करीत तिच्यावर दंड आकारण्याची मागणी केली होती. अर्थात ही मागणी मागणी न्यायालयाने अमान्य केली.

काय आहे प्रकरण

महाराष्ट्र सेल्स टॅक्स विभागाने महाराष्ट्र मूल्य वर्धीत कर अंतर्गत अनुष्का यांना 2012-13, 2013-14, 2014-15 आणि 2015-16 या वर्षांसाठी कोट्यवधी रूपयांचा सेल्स टॅक्स लावला आहे. हा कर वसुल करण्यासाठी अनुष्का यांना चार नोटीसी बजावण्यात आल्या होत्या. या नोटीसी विरोधात चार याचिका दाखल केल्या होत्या. यावर सुनावणी घेताना हायकोर्टाच्या खंडपीठाने सांगितले की जर याचिकाकर्त्यांकडे कायद्यानूसार अपिल करण्याचा अधिकार आहे तर त्याने त्याचा आधी वापर करावा. कोर्टाने याचिका फेटाळत डेप्युटी सेल्स टॅक्स कमिश्नरकडे अपिल दाखल करण्याचा निर्देश दिला आहे. वास्तविक अॅक्टनूसार येथे अपिल करण्यापूर्वी डिपार्टमेंटने लावलेल्या टॅक्सच्या एकूण रकमेपैकी दहा टक्के कर भरावा लागतो.

 याचिकेत काय म्हटले होते 

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का हीने अवार्ड फंक्शन किंवा स्टेज शोमध्ये आपल्या सहभागाचा कॉपीराईट घेतला आहे. त्यामुळे त्यांना होणाऱ्या कमाईतून सेल्स टॅक्स जमा करावा लागणार असल्याचे विक्री कर विभागाचे म्हणणे आहे. तर अभिनेत्रीचे म्हणणे आहे की कलाकार जरी स्टेज परफॉर्म करीत असला तरी तो निर्माता ठरत नाही, व्हिडीओचा कॉपीराईट नेहमी निर्मात्याकडे असतो. त्यामुळे आपल्याकडून कर मागणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अनुष्का यांच्यावर किती सेल्स टॅक्स लावला ?

2012-13 या वर्षासाठी 12.3 कोटी रुपयांवर 1.2 कोटी विक्रीकर आकारण्यात आला आहे. आणि 2013-14 साठीच्या 17 कोटी रुपयांवर 1.6 कोटी रुपये विक्रीकर आकारण्यात आला आहे.विक्रीकर विभागाने 2021 ते 2022 दरम्यान हे आदेश पारित केले आहेत.