
मुंबई, 17 जुलै 2023 : गायक हिमेश रेशमिया याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. हिमेश याने स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर झगमगत्या विश्वात भक्कम ओळख निर्माण केली. पण एक दिवस असा आला जेव्हा कायम आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असणारा हिमेश रेशमिया त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. हिमेश रेशमिया याने पत्नीच्या मैत्रीणीसोबतच गुपचूप लग्न केलं. तेव्हा अनेकांनी गायकाचा विरोध देखील केला. हिमेश रेशमिया याने दुसऱ्या प्रेमासाठी २२ वर्षांचा संसार मोडला. महत्त्वाचं म्हणजे पतीच्या सुखासाठी हिमेश रेशमिया याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला. तर कशी होती गायकाची लव्हस्टोरी जाणून घेवू..
विवाहित असताना देखील हिमेश रेशमिया यांचा जीव पत्नीची मैत्रीण सोनिया कपूर हिच्यावर जडला. गायकाचा ज्या तरुणीवर जीव जडला होती, तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. एवढंच नाही तर सोनिया हिमेश याची पहिली पत्नी कोमल हिची फार चांगली होती.
सोनिया आणि हिमेश एकाच इमारतीत रहायचे. म्हणून सोनिया हिचं हिमेश – कोमल यांच्या घरात येणं – जाणं असायचं. हिमेश आणि सोनिया यांची पहिली भेट देखील गायकाची पहिली पत्नी कोमल हिच्यामुळेच झाली होती. पण कोमल हिला काय माहिती होतं, की सोनिया तिचं संसार मोडेल आणि मैत्रीणच आपली सवत होईल.
सोनिया आणि हिमेश यांनी २००६ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. पण पतीच्या अफेअरबद्दल कोमल हिला काहीही माहिती नव्हतं. हिमेश सोनियाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता. एवढंच नाही तर गायकाने २२ वर्षांचा संसार देखील मोडला. अशात कोमल आणि हिमेश यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झालं.
एका मुलाखतीत हिमेशने कबूल केले की कोमल आणि त्याने परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. कोमल आणि हिमेशला एक मुलगाही आहे, ज्याची काळजी दोघेही घेत आहेत. तेव्हा हिमेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला होता.
इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी गायकांमध्ये गणल्या जाणार्या हिमेशने १२ सोनिया हिला डेट केलं. ११ मे २०१८ मध्ये हिमेश आणि सोनिया यांनी लग्न केलं. हिमेश आणि सोनिया लोखंडवाला येथील अपार्टमेंटमध्ये विवाहबंधनात अडकले. दोघांच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.
हिमेश आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. गायक कायम दुसरी पत्नी सोनिया हिच्यासोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर देखील गायकाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते देखील गायकाच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.