किस करायला जाताच हिनाच्या पतीने फिरवलं तोंड; लग्नाच्या महिनाभरातच दोघांमध्ये ‘पंगा’?

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान लवकरच एका शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत तिचा पती रॉकी जैस्वालसुद्धा दिसणार आहे.

किस करायला जाताच हिनाच्या पतीने फिरवलं तोंड; लग्नाच्या महिनाभरातच दोघांमध्ये पंगा?
हिना खान, रॉकी जैस्वाल
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 01, 2025 | 8:39 AM

टेलिव्हिजनवर लवकरच एक नवीन रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये बरेच लोकप्रिय सेलिब्रिटी जोड्या भाग घेणार आहेत. या जोड्यांची केमिस्ट्री, त्यांची भांडणं, त्यांच्यातील प्रेम, वाद-विवाद हे सर्व प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. या शोचं नाव आहे ‘पती पत्नी और पंगा’. नावावरूनच या शोची थीम सहज स्पष्ट होते. टेलिव्हिजन आणि फिल्मी विश्वातील जोडप्यांचं आयुष्य प्रेक्षकांना खूप जवळून पहायला मिळणार आहे. यामध्ये नवविवाहित दाम्पत्य हिना खान आणि रॉकी जयस्वालसुद्धा भाग घेणार आहेत. नुकतंच या दोघांना या शोच्या सेटवर पाहिलं गेलं. त्याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडीओमध्ये हिना तिच्या पतीच्या कानात काहीतरी बोलताना दिसतेय. त्यानंतर ती त्याच्या गालावर किस करायला पुढे होते, परंतु रॉकी अचानक त्याचं तोंड फिरवतो. यानंतर हिना लगेच गोंधळून दुसरीकडे बघू लागते. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हिना आणि रॉकीची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. 2012 मध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या मालिकेत हिना मुख्य भूमिकेत होती, तर रॉकी हा निर्माता होता. याच मालिकेत काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी एकमेकांच्या कठीण काळात खूप साथ दिली. हिनाला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर रॉकी तिच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. संपूर्ण उपचारादरम्यान तो हिनाची विशेष काळजी घेताना दिसला होता. त्यानंतर 4 जून 2025 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. हिना मुस्लीम असून रॉकी हिंदू आहे. त्यामुळे या आंतरधर्मीय लग्नाची सोशल मीडियावरही चर्चा झाली.

हिना खानला गेल्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर सर्जरी झाली. किमोथेरपीदरम्यान हिनाच्या प्रकृतीवर बराच परिणाम झाला होता. तिने तिचे केससुद्धा कापले होते. आता हळूहळू या सर्व गोष्टींमधून ती सावरत असून त्यात रॉकीची तिला खंबीर साथ मिळत आहे.

‘पती पत्नी और पंगा’ ही मालिका कलर्स टीव्हीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 2 ऑगस्टपासून ही मालिका दर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 9.30 वाजता प्रदर्शित होणार आहे. या शोचं सूत्रसंचालन सोनाली बेंद्रे आणि मुनव्वर फारुकी करणार आहेत.