हिना खानला ज्या रात्री कॅन्सरविषयी समजलं तेव्हा खाल्लं गोड; म्हणाली “बॉयफ्रेंड घरी आला अन्..”

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. कॅन्सरवरील उपचारांना ती अत्यंत धाडसाने सामोरी जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिनाने कॅन्सरच्या निदानावर तिची पहिली प्रतिक्रिया काय होती, याविषयी खुलासा केला.

हिना खानला ज्या रात्री कॅन्सरविषयी समजलं तेव्हा खाल्लं गोड; म्हणाली बॉयफ्रेंड घरी आला अन्..
Hina Khan with mother
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 09, 2025 | 1:16 PM

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. कॅन्सरच्या निदानानंतर हिना अत्यंत धाडसाने सर्व उपचारांना सामोरं जात आहे. सोशल मीडियाद्वारे ती तिचा हा प्रवास चाहत्यांसोबत शेअर करत असते. नकारात्मक परिस्थितीतही सकारात्मक कसं राहावं, हे हिनाकडे पाहून शिकायला मिळतं. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या असंख्य रुग्णांना प्रेरणा देण्याचं काम हिना करतेय. उपचार सुरू असतानाही हिनाने तिचं काम थांबवलेलं नाही. विविध शोजमध्ये ती प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहतेय आणि त्यामध्ये ती कॅन्सरविरोधातील लढाईबद्दल मोकळेपणे व्यक्त होतेय. नुकतीच ती ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर’ या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने कॅन्सरबद्दल समजताच पहिली प्रतिक्रिया काय होती, त्याविषयी सांगितलं.

या शोचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये कोरिओग्राफर गीता कपूर हिनाला विचारते, “तुझी कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. परंतु एक क्षण असाही असेल, जेव्हा तुला वाटलं असेल की मला यापद्धतीने उपचार घ्यायचे आहेत. तो क्षण कोणता होता?” गीता कपूरच्या या प्रश्नाचं उत्तर देताना हिनाने कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तिच्या प्रतिक्रियेविषयी सांगितलं.

हिना म्हणाली, “ज्या रात्री मला कॅन्सरबद्दल समजलं, तेव्हा माझा पार्टनर माझ्या घरी आला होता. मला डॉक्टरांनी कॉल केला नव्हता. रॉकीने (बॉयफ्रेंड) सांगितलं की मॅलिग्नंसी आहे, रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहेत. दहा मिनिटांनंतर मला आठवलं, रॉकी घरी येण्याआधी मी माझ्या भावाला सांगत होती की मला आज फालूदा खायची इच्छा होतेय. मला समजलं की घरात गोड पदार्थ आला आहे, चांगलंच असेल. या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहुयात आणि चला काहीतरी गोड खाऊयात, असं म्हटलं.” हिनाची ही प्रतिक्रिया ऐकून सर्वांनी तिच्या धाडसाला सलाम केला.

या शोमध्ये हिनाने तिचं आवडतं ‘लग जा गले’ हे गाणंसुद्धा गाऊन दाखवलं. याआधी हिना सलमान खानच्या ‘बिग बॉस 18’मध्येही गेली होती. या शोमध्येही सलमानने तिला लवकरात लवकर बरं होण्यास सांगून आधार दिला.