कधी कोणावर प्रेम केलं का? हिना खानने श्री श्री रविशंकर यांना विचारला खासगी प्रश्न, मिळालं हे उत्तर

हिना खान ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करत असून नुकतीच तिने अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. बॉयफ्रेंड रॉकीसोबत ती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बेंगळुरूमधील आश्रमात गेली होती. यावेळी तिने रविशंकर यांना त्यांच्या लव्ह लाइफबद्दल प्रश्न विचारला.

कधी कोणावर प्रेम केलं का? हिना खानने श्री श्री रविशंकर यांना विचारला खासगी प्रश्न, मिळालं हे उत्तर
Hina Khan and Sri Sri Ravishankar
Image Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2025 | 4:20 PM

कॅन्सरशी झुंज देणारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान नुकतीच तिच्या बॉयफ्रेंडसोबत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या बेंगळुरू इथल्या आश्रमात पोहोचली. हिना आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबतच इतरही सेलिब्रिटींनी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली. यामध्ये ‘बारवी फेल’ चित्रपटाचा अभिनेता विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर, अभिनेत्री प्रियांचा चोप्राची आई मधु चोप्रा यांचाही समावेश होता. हिनाने ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आश्रमात अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. यावेळी तिने त्यांना काही गमतीशीर प्रश्नसुद्धा विचारले.

हिनाने रविशंकर यांना विचारलं, “तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं का?” या प्रश्नाचं उत्तर देताना रविशंकर म्हणाले, “मी तर प्रेम करत राहतो नेहमी. असं नाहीये की कोणा एकाच्या प्रेमात मी पडलोय. पण एखाद्याच्या लव्ह-लाइफमध्ये काही गडबड झाल्यास अनेकदा लोक बाबा बनतात. एखाद्याचा हृदयभंग झाला असेल तर तो त्या दु:खामुळे अध्यात्माच्या मार्गावर चालू लागतो. माझ्या बाबतीत असं काही झालं नाही.”

“आम्ही इथे बसलेल्या सर्वांच्या तुटलेल्या मनाला जोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच मी म्हणतो की आम्ही इथे हृदयाला रिपेअर करतो”, असं रविशंकर पुढे म्हणाले. त्यांच्या उत्तराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हिना खान मुस्लीम असली तरी अनेकदा ती हिंदू धर्मातील मंदिरात देवदर्शनासाठी गेल्याचंही पहायला मिळालं. हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी हा हिंदू आहे. त्यामुळे हो दोघं एकमेकांच्या धर्माचा खूप आदर करताना दिसतात. हिनाने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमात काही वेळ ध्यानसाधनासुद्धा केली.

आश्रमाच्या भेटीचे क्षण इन्स्टाग्रामवर फोटोंच्या रुपात पोस्ट करत हिनाने लिहिलं, ‘आम्हा सर्वांची इथे येण्याची कारणं वेगवेगळी होती, आम्हा सर्वांना वेगवेगळं बोलावणं आलं होतं. पण इथे आल्यानंतर हे एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे वाटलं. इथं आम्ही ध्यान कसं करायचं ते शिकलो, आमची आंतरिक शांती आणि शक्ती कशी सक्रिय करायची ते शिकलो. आम्ही काही जुन्या पद्धतीदेखील सोडल्या आणि जुन्या बंधनांनाही तोडून टाकले. आम्ही एकमेकांसोबत खूप मजा केली आणि एकमेकांचे चांगले मित्र झालो.’