Holi 2024 : बॉलिवूडच्या ‘या’ गाण्याशिवाय रंगपंचमी फिकी, गाण्यांनी तोडलेत अनेक रेकॉर्ड

| Updated on: Mar 19, 2024 | 11:51 AM

काही दिवसांत आता रंगपंचमी आहे, त्यामुळे बॉलिवूडची अशी काही गाणी आहेत, ज्यांच्याशिवाय होळी पूर्ण होऊच शकत नाही... 'या' गाण्यांमुळे तुमची रंगपंचमी होईल खास... लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये रंगपंचमीचा उत्साह

Holi 2024 : बॉलिवूडच्या ‘या’ गाण्याशिवाय रंगपंचमी  फिकी, गाण्यांनी तोडलेत अनेक रेकॉर्ड
Follow us on

Holi 2024 : 25 मार्च म्हणजे येत्या सोमवारी रंगपचमी आहे… लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतो. पण बॉलिवूडच्या काही गाण्यांशिवाय कोणताच सण पूर्ण होत नाही. त्यामुळे होळी देखील बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय अपूरी आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षातील होळी खास करण्यासाठी बॉलिवूडची काही खास गाणी तुमच्या ओठांवर आली नाही तर, ती रंगपंचमी कसली? तर मंगळवारी रंगपंचमीच्या निमित्ता बॉलिवूडच्या या गाण्यावर नक्की ठेका धरा…

‘होली के दिन दिल मिल जाते हैं’ हे गाणं आजही चाहत्यांच्या मनात आणि ओठांवर आहे. ‘शोले’ सिनेमातील हे गाणं आजही तुफान प्रसिद्ध आहे. सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हे सुद्धा वाचा

‘ये जवानी है दिवानी’ सिनेमा 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. पण आजही अनेक जण सिनेमा मोठ्या आनंदाने पाहतात. सिनेमातील ‘बलम पिचकारी’ हे गाणं होळीसाठी अत्यंत खास आहे. सिनेमा चाहते आजही तितक्याच आनंदाने पाहतात.

अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री हेमा मालिनी स्टारर ‘बागबान’ सिनेमातील प्रत्येक गाणं हिट ठरलं. पण ‘होली खेले रघुवीरा’ या गाण्याने चाहत्यांचं मन जिंकलं.  गाणं आजही चाहते विसलेले नाहीत.

शाहरुख खान याच्यावर देखील होळीचे सीन शूट करण्यात आले आहेत. अभिनेता शाहरुख खान स्टारर डर सिनेमातील ‘अंग से अंग लगाना साजन हमे ऐसे रंग लगाना’ हे गाणे सर्वांना आठवत असेल.  हे गाणं होळीच्या दिवशी आजही चाहत्यांना आठवतो.

बॉलिवूडच्या यांसारख्या अनेक गाण्यांमुळे तुमची होळी देखील खास होणार आहे. रविवारी होलीका दहन आणि सोमवारी रंगपंचमी आहे. आता पासूनच अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या तयारीला सुरुवात देखील झाली आहे. सध्या प्रत्येक जण होळीच्या प्रतीक्षेत आहे.