‘होमबाऊंड’ ऑस्करच्या रेसमधून बाहेर, आंतरराष्ट्रीय श्रेणीत या 5 चित्रपटांना स्थान

ऑस्कर नामांकनांची घोषणा अखेर झाली आहे. भारतीय चित्रपट 'होमबाऊंड'ला आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. मात्र, होमबाऊंड चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

होमबाऊंड ऑस्करच्या रेसमधून बाहेर, आंतरराष्ट्रीय श्रेणीत या 5 चित्रपटांना स्थान
'Homebound' is out of the Oscar race, a major setback for India.
| Updated on: Jan 22, 2026 | 10:03 PM

९८ व्या ऑस्करचे नॉमिनेशन २२ जानेवारी रोजी जाहीर झाले आहे. या नॉमिनेशनमध्ये अनेक हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांना जागा बनवली आहे. भारतातून आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म कॅटगरीतून होमबाऊंड शॉर्टलिस्ट झाली होती. चाहते या चित्रपटाला नॉमिनेशन मिळेल याची वाट पाहात होते. परंतू आता चाहत्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. होमबाऊंड ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट वर्गवारीत नामांकन मिळालेले नाही.

आंतरराष्ट्रीय चित्रपट कॅटगरीत या ५ चित्रपटांना स्थान

1) ब्राझीलचा दि सीक्रेट एजेंट,

2) फ्रान्सचा इज वॉज जस्ट एन एक्सीडेन्ट,

3) नॉर्वेचा सेंटीमेंट व्हॅल्यू,

4) स्पेनचा Sirat

आणि 5 ) ट्युनिशियाचा ‘द वॉइस ऑफ हिंद रजब’

यांना आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म कॅटगरीत नॉमिनेशन मिळाले आहे.

विशाल जेठवा यांची प्रतिक्रीया

‘होमबाऊंड’ हा चित्रपट ऑस्करच्या फायनलमधून बाहेर पडल्यानंतर यातील अभिनेता विशाल जेठवा याने आपली प्रतिक्रीया दिली आहे. हिंदूस्थान टाईम्सशी बोलताना तो म्हणाले आम्ही फायनल नॉमिनेशमध्ये पोहचो नाही., अखेरच्या १५ सर्वोत्कृष्ट चित्रपटात समावेश होणे हा देखील एक महत्वाची गोष्ट आहे. होमबाऊंड इतक्या दूर पोहचणे, जगाभरात भारताचे प्रतिनिधीत्व करणे हे खूपच खास अनुभव होता. या चित्रपटाचा एक भाग झालो यासाठी मी आभारी आहे. आम्ही इतके पुढे आलो होतो,त्यामुळे एक आशा होती. ज्या कोणी हा चित्रपट पाहिला त्यांना हा चित्रपट आवडला. त्यांनी कथेला स्ट्राँग म्हटले.ही सुद्धा एका मोठ्या उपलब्धी सारखेच आहे’.

‘होमबाऊंड’ हा चित्रपट दिग्दर्शक नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केला आहे. यात इशान खट्टर , जान्हवी कपूर,विशाल जेठवा यांच्या मुख्य भूमिका आहेत.यात शालिनी वत्सा, चंदन के. आनंद सारखे अभिनेते होते.या चित्रपटाला चांगले रिव्यूज मिळाले होते. क्रिटिकली या चित्रपटाची वाहवा झाली होती. मात्र बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट खास चालला नाही. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शनने केली आहे.