
Hrithik Roshan : अभिनेता हृतिक रोशल याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. कधीकाळी सिनेमे आणि डान्समुळे चर्चेत असणार हृतिक आता खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. हृतिक सध्या सबा आझाद हिला डेट करत आहे. तर सुझान खान हिच्यासोबत अभिनेत्याचा घटस्फोट झाला आहे. सुझान हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी आणि लग्नानंतर देखील अभिनेत्याचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. भाजपच्या महिला खासदारासोबत देखील हृतिक रिलेशनशिपमध्ये होता. पण त्यांचं अफेअर कमी ब्रेकअपच्या चर्चांनी सर्व मर्यादा ओलांडल्या.
ज्या महिला खासदारासोबत हृतिक रोशन याचे खासगी संबंध होते, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर, अभिनेत्री कंगना राणौत आहेत. खुद्द कंगना यांनी हृतिक याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, हृतिकवर प्रेम करणं माझ्यासाठी मृत्यूसमान होतं… असं देखील कंगना म्हणाल्या होत्या…
सांगायचं झालं तर, हृतिक आणि कंगना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या तेव्हा हृतिक वैवाहिक होता आणि त्याला दोन मुलं देखील होती. या अफेअर वाईट परिणाम अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यात झाला. एका नाईट पार्टीतील लीक झालेल्या फोटोंमुळे हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्या अफेअरच्या अफवांना दुजोरा मिळाला. या फोटोंमध्ये कंगना राणौत आणि हृतिक रोशन खूपच रोमँटिक मूडमध्ये दिसले.
हृतिक रोशन याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कंगना यांनी एका मुलाखतीत नात्याबद्दल मोठा खुलासा केलेला. कंगना म्हणालेल्या, ‘मी खूप मोठा अपमान सहन केला आहे … ज्याचा कोणताही हिशेब नाही. मी रात्रभर रडत असायचे… मला झोप देखील यायची नाही… त्याच्यावर प्रेम माझ्यासाठी मृत्यूसमान होतं…’
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कंगना यांनी अनेकदा अभिनेत्यावर गंभीर आरोप केले. पण हृतिक याने कधीच कंगना यांच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं नाही.. दोघांनी ‘क्रिश 3’ सिनेमात एकत्र काय केलं होतं. बॉक्सऑफीस सिनेमाने बक्कळ कमाई केली. एवढंच नाही तर, कंगना आणि हृतिक यांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.