
बॉलिवूडचा हँडसम बॉय अभिनेता हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचा विवाह २० डिसेंबर २००० रोजी झाला होता. हृतिक रोशनच्या विवाहानंतर अनेक तरुणींचा हिरमोड झाला होता. कारण हृतिक रोशनबाबत क्रश असलेल्या अनेक तरुणी आजही आहेत. हृतिक रोशन आणि सुझैन यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या 6 वर्षांनंतर 2006 मध्ये ह्रिहान आणि 2008 मध्ये हृदानचा जन्म झाला. पण नंतर हळूहळू त्यांच्या प्रेमात दुरावा निर्माण झाला. 31 ऑक्टोबर 2014 रोजी या जोडप्याचा घटस्फोट झाला.
घटस्फोट झाल्यानंतर भरपाई म्हणून हृतिकने सुझैनला अंदाजे 380 कोटी रुपये द्यावे लागले होते. भारतातील सर्वात महागड्या घटस्फोटांच्या यादीत हृतिकचा घटस्फोट पहिल्या क्रमांकावर आहे.
घटस्फोटाच्या जवळपास दोन वर्षानंतर, 2016 मध्ये एका मुलाखतीत सुझैन खानने हिने तिच्या घटस्फोटावर मौन सोडले होते. तिने म्हटले होते की, “आम्ही आमच्या आयुष्यातील अशा टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे मी ठरवले की आम्ही एकत्र नसलेले चांगले आहे. खोट्या नातेसंबंधात न राहणे आणि जागरूक राहणे महत्वाचे आहे. आम्ही जवळचे (मित्र) आहोत.” सुजैनने सांगितले की, आम्ही मुलांसाठी मित्र राहणे निवडले आहे.
‘ऋतिक-कंगना यांच्यात वाद झाला तेव्हा सुझैनने हृतिकला पाठिंबा दिला होता. तिने ट्विट केले की क्वीन अभिनेत्रीने लीक केलेले सर्व फोटो मॉर्फ केलेले आहेत.
हृतिक आणि सुजैन वेगळे झाले असले तरी ते त्यांच्या मुलांसाठी अनेकदा एकत्र येतात. ते विविध सुट्ट्यांमध्ये आणि कौटुंबिक डिनरमध्ये देखील एकत्र दिसतात. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी ते सर्व करत आहेत.
हृतिक रोशन आणि सुजैन खान यांचा मुलगा रिहानच्या 18 व्या वाढदिवसानिमित्त पार्टीत हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादही हजर होती. सुझैन आणि सबा यांचे एकत्र फोटो देखील सोशल मीडियावर समोर आले होते. सुझैन देखील तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी याच्यासोबत मुलगा हृधनसोबत आनंदाने पोज देताना दिसली होती.
सुझैन अर्सलान गोनीला डेट करत आहे तर हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.