Pankaj Tripathi | ‘मी आता थकलोय म्हणून…’, असं का म्हणाले पंकज त्रिपाठी?

Pankaj Tripathi | पंकज त्रिपाठी हे त्यांच्या दमदार अभिनयकौशल्यासोबतच शांत आणि विनम्र स्वभावासाठी ओळखले जातात. पण आता पंकज त्रिपाठी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. 'मी आता थकलोय म्हणून...', असं का म्हणाले पंकज त्रिपाठी?

Pankaj Tripathi | मी आता थकलोय म्हणून..., असं का म्हणाले पंकज त्रिपाठी?
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2023 | 3:20 PM

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आतापर्यंत अनेक सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत पंकज त्रिपाठी अव्वल स्थानी आहेत. पंकज त्रिपाठी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेते पंकज त्रिपाठी हे त्यांच्या दमदार अभिनयकौशल्यासोबतच शांत आणि विनम्र स्वभावासाठी ओळखले जातात. चाहते पंकज त्रिपाठी यांच्या आगामी सिनेमासाठी देखील कायम चर्चेत असतात. नुकताच पंकज त्रिपाठी ‘OMG 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली नाही. पण पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता पंकज त्रिपाठी ‘फुकरे ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले आहेत.

दरम्यान नुकताच झालेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंकज त्रिपाठी म्हणाले, ‘मी सिनेमांमध्ये काम करणं आता बंद केलं आहे. कारण मी आता थकलो आहे. सिनेमांमध्ये सलग काम करत असताना एक वेळ अशी आली, जेव्हा मला आठवत देखील नव्हतं मी केव्ह, कधी, कुठे आणि कोणता सीन शूट केला..’ सध्या सर्वत्र पंकज त्रिपाठी यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

पुढे पंकज त्रिपाठी म्हणाले, ‘आयुष्यात आलेली ही परिस्थिती योग्य नाही. ३४० दिवस कोणी अभिनय करू शकत नाही आणि मी तेच करत होतो. पण आता मी असं काहीही करणार नाही. मी सिनेमांच्या कथा ऐकल्या, मला आवडल्या आणि सिनेमा करण्यासाठी होकार दिला. जर तुम्हा प्रचंड भूक लागली असेल तर, तुम्ही प्रमाणाबाहेर जेवता. असंच काही माझ्यासोबत देखील झालं.’ असं देखील पंकज त्रिपाठी म्हणाले.

पंकज त्रिपाठी यांचे सिनेमे…
‘OMG 2’ सिनेमानंतर पंकज त्रिपाठी ‘फुकरे ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले आहेत. पंकज त्रिपाठी यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘मैं अटल हूं’ सिनेमातून अभिनेते चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा असणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शन रवी जाधव यांच्या खांद्यावर आहे.