Akshaye Khanna : ‘ तेव्हा मी अक्षय खन्नासाठी वेडी होते..’ करीनाने सांगितली दिल की बात.. जुना व्हिडीओ व्हायरल

2025 हे वर्ष अक्षय खन्नाचं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या 'छावा'मध्ये अक्षयने क्रूरकर्मा औरंगजेबाची भूमिका साकारली. त्याची थंड नजर, क्रौर्य याने सगळेच स्तिमित झाले. त्यानंतर हे वर्ष संपताना तो पुन्हा खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे

Akshaye Khanna :  तेव्हा मी अक्षय खन्नासाठी वेडी होते..  करीनाने सांगितली दिल की बात.. जुना व्हिडीओ व्हायरल
करीना कपूर खान- अक्षय खन्ना
| Updated on: Dec 11, 2025 | 9:21 AM

जोरदार संवादफेक न करताही फक्त थंड डोळ्यांनी देखील बोलता येतं, अभिनय करून दाखवण्याची चीज नाही, तो सहज होतो…. आजच्या स्टार्सच्या जमान्यात खरा अभियन दाखवत नाणं पुन्हापुन्हा खणखणीतपणे वाजवणारा ‘धुरंधर’ अक्षय खन्नाची (Akshaye Khanna) चर्चा सगळ्यांच्याच ओठी आहे. ‘धुरंधर’ मध्ये खलनायक रेहमान डकैत साकारताना जो स्वॅग अक्षयने दाखवलाय, त्याच्या कामाचं, भूमिकेच प्रचंड कौतुक होतंय. चित्रपटातील त्याच्यावर एक गाणं, त्याचा डान्सय म्युझिक सगळंच प्रचंड गाजतंय आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरलही होतंय.

यानंतर अनेक जण अक्षयचे तोंडभरून कौतुक करत असून याचदरम्यान नामवंत अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) हिचा एक जुना व्हिडीओही सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने फिरतोय. 2002 साली ‘हलचल’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, करीनाने अक्षयबद्दलचं प्रेम उघडपणे व्यक्त केलं होतं. मी अक्षयची खूप मोठी चाहती आहे. मी त्याचा ‘हिमालयपुत्र’ हा चित्रपट किमान 20 वेळा पाहिला आहे. तेव्हा मी शाळेत होते आणि अक्ष खन्ना हाँ सर्व मुलींचा क्रश होता, मी सुध्या त्याच्या मागे खूप वेडी होते, असं सांगत बेबोने तिचं प्रेम व्यक्त केलंय

करीनाने केलं अक्षयंच कौतुक

त्यानंतर करीनाने अक्षयचं भरभरून कौतुक केलं. “अक्षय हा खूप गोड, आकर्षक आणि अद्भुत माणूस आहे. त्याच्यासाठी अनेक मुली वेड्या होत्या, मी त्यापैकी एक होते. तो एक हुशार अभिनेता आहे. हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी तो परिपूर्ण व्यक्ती आहे. तो खूप गोंडस आहे.” अशा शब्दात करीनाने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तिचा हा जुना व्हिडीओ आता पुन्हा एकदा व्हायरल झालाय.

 

2004 साली आलेला “हलचल” हा चित्रपट प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट मल्याळम चित्रपट “गॉडफादर” चा हिंदी रिमेक होता. अक्षय खन्ना आणि करीना कपूर यांच्या चर या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्याच, पण त्यासह सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अरबाज खान, अर्शद वारसी, अमरीश पुरी आणि परेश रावल यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. दोन कुटुंबातील शत्रुत्वावर आधारित हा चित्रपट कॉमेडी जॉनरचा होता.

छावा मधून अक्षयने सर्वांना केलं इंप्रेस

2025 हे वर्ष अक्षय खन्नाचं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या ‘छावा’मध्ये अक्षयने क्रूरकर्मा औरंगजेबाची भूमिका साकारली. त्याची थंड नजर, क्रौर्य याने सगळेच स्तिमित झाले. त्यानंतर हे वर्ष संपताना तो पुन्हा खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. ‘धुरंधर’ मध्ये त्याचारेहमान डकैत हाही कमी क्रूर नाही. त्याची भूमिका, काम, त्याची नजर, त्याचा स्वॅग.. सगळं सगळं लोकांना आवडतंय. म्हणूनच यत्र तत्र सर्वत्र,, सध्य सगळीकडे अक्षय खन्नाच दिसत आहे. आता लवकरच तो ‘महाकाली’ मध्ये शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

तर अभिनेत्री करीना कपूर ही लवकरच ‘दायरा’ मध्ये झळकणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून यात करीनासोबत पृथ्वीराज सुकुमारन हाही दिसेल. 2026 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.