Priyanka chopra : matrix resurrections च्या नव्या व्हिडिओत प्रियंकाच्या अदांवर चाहते फिदा, हा हटके अंदाज पाहा

the matrix resurrections चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. त्यावेळी प्रियंकाचा हटके लूक समोर आला होता. आता त्यातला एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात प्रियंका चोप्रा हटके अंदाजात डोळा मारताना दिसून येतेय.

Priyanka chopra : matrix resurrections च्या नव्या व्हिडिओत प्रियंकाच्या अदांवर चाहते फिदा, हा हटके अंदाज पाहा
याच दरम्यान, प्रियांकाच्या मॅट्रिक्स या चित्रपटाचे पोस्टरही रिलीज झाले आहे. प्रियांकाचा लूक खूपच वेगळा आहे आणि चाहत्यांनाही त्यावर चांगला प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे प्रियांकाचे हे पोस्टर तिचा दिर डॅनियल जोन्सनेही शेअर केले आहे. त्यामुळे देसी गर्लच्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत आहे असे म्हणायला हरकत नाही.
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 2:52 PM

अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच चर्चेत असते, यावेळी मात्र ती एका हटके कारणावरून चर्चेत आलीय. matrix resurrections च्या नव्या व्हिडिओत प्रियंका डोळा मारताना दिसून आलीय. प्रियंकाच्या या हटके अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.  the matrix resurrections चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. त्यावेळी प्रियंकाचा हटके लूक समोर आला होता. आता त्यातला एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात प्रियंका चोप्रा हटके अंदाजात डोळा मारताना दिसून येतेय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

प्रियंका हॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटात

प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमधील एका मोठ्या प्रोजेक्टचा हिस्सा आहे. the matrix resurrections या प्रियंकाच्या नव्या चित्रपटांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. अशात फिल्ममधला एक टीवी स्पॉट समोर आलाय. त्यात ती डोळा मारताना दिसून येतेय. काही दिवसांपूर्वी प्रियंकाचा लूक समोर आल्यानंतरही त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

व्हिडिओत प्रियंकाचा हटके लूक

नव्यानं समोर आलेल्या व्हिडिओत प्रियंका एक मोठा चष्मा, टी-शर्ट आणि स्कार्फमध्ये दिसून येतेय. या व्हिडिओत प्रियंका कुणाशी तरी बोलत असताना दिसून येतेय, नंतर ती त्याच व्यक्तीला हाताने इशारा करत डोळा मारतेय. प्रियंकाच्या या अदा चाहत्यांना चांगलीच भुरळ घालत आहेत. त्यामुळे चाहते प्रियंकाच्या हटके अदांवर फिदा झालेले दिसून येत आहेत. फिल्मच्या पोस्टरमध्येही प्रियंका एका वेगळ्या लूकमध्ये दिसून येतेय. त्याही लूकची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रियंकाचा हा बहुचर्चीत चित्रपट 22 डिसेंबरला रिलीज होणार आहे. त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

Jhanvi Kapoor : जान्हवी कपूरचे जबरदस्त फोटो पाहून चाहते घायाळ, पाहा फोटो!

ऑनलाईन ओळख, लग्नाच्या बेडीत अडकवून 8 दिवसात छूमंतर, नवरदेव कसा अडकला जाळ्यात?

स्टार्ट अपमध्ये जगाचे नेतृत्व भारताच्या हातात; 70 पेक्षा अधिक स्टार्ट अपने ओलांडला एक अब्ज डॉलरचा टप्पा – मोदी