लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?

Menstrual Period Pain : लाज वाटली पाहिजे... मासिक पाळीवर प्रसिद्ध अभिनेत्री असं म्हणाली तरी काय? फक्त महिलांनीच नाही तर, पुरुषांनी देखील साधला तिच्यावर निशाणा? नेमकं म्हणाली तरी काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा..., मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
Sreeleela
| Updated on: Apr 11, 2026 | 8:21 AM

Menstrual Period Pain : झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील साउथ सिनेविश्वातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. मासिक पाळी दरम्यान महिलांना होणाऱ्या वेदनेबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अनेक महिला मासिक पाळीच्या नावाखाली कामचुकारपणा करतात असं वक्तव्य श्रीलीला हिने केलं आहे. तर जाणून घ्या श्रीलीला नेमकं काय म्हणाली? आणि नेटकरी का भडकले?

मुंबईच्या डी. वाय. पाटील विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळवलेल्या अभिनेत्री श्रीलीलाने, ‘उस्ताद भगत सिंग’ या सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये चाहत्यांना संबोधित करताना एक वादग्रस्त विधान केलं. ती म्हणाली की, मुलींनी ‘मासिक पाळी’चं निमित्त करण्याऐवजी स्वतःला शारीरिक मर्यादांच्या पलीकडे ढकलले पाहिजे. श्रीलीला म्हणाली,

‘सिनेमातील माझी सर्व गाणी जवळपास प्रेक्षकांना आवडली आहेत. मला एक गोष्टा सांगायची आहे की, गाण्यांचं शुटिंग सुरु असताना माझी मासिक पाळी सुरु होती. त्यामुळे कोणीच कामचुकारपणा करु शकत नाही… आपल्याला आपले अधिकार हवे असतील… बरोबरीची अपेक्षा करताय तर आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक अडचणींवर मात करून पुढे जायलाच हवे. यासाठी कोणतीही सबब चालणार नाही.’ असं अभिनेत्री म्हणाली.

श्रीलीला हिच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांचा संताप…

महिलांच्या मासिक पाळीच्या विधानावर केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे… एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मासिक पाळीमध्ये प्रत्येकाच्या वेदना वेगळ्या असतात. तू या काळात सर्वत्र जाऊ शकतेस, याचा अर्थ असा होत नाही की, दुसऱ्या महिलांनी देखील असं करायला हवं.’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाली, ‘मला मासिक पाळी दरम्यान प्रचंड वेदना होतात. प्रत्येक महिन्यात या भयानक वेदनेसह आम्ही कामाला जातो… मुलांना सांभाळतो… तर हा काय एक बहाना आहे का?’

अन्य एक नेटकरी म्हणाला, “तुला मासिक पाळीच्या वेदना होत नाहीत, याचा अर्थ असा नाही की दर महिन्याला या भयंकर वेदना सहन करणाऱ्या इतर महिलांच्या दुःखाला कमी लेखावं. हे 2026 साल आहे आणि तरीही आपण महिलांना कमी लेखत आहोत आणि त्यांच्या वेदनांना एक निमित्त म्हणत आहोत. तू स्वतः एक डॉक्टर आहेस, तुला लाज वाटायला हवी.”

Follow Us