Samay Raina : ‘पती – बेटे नल्ले है…’, समर रैनाकडून सरळ चारचौघात अर्चनाच्या नवऱ्या-मुलांचा अपमान! VIDEO व्हायरल

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंटच्या एका एपिसोडमध्ये समय याने अर्चना पूरन सिंह हिची खिल्ली उडवली. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत लेटेंटच्याआहे की, समय याने अर्चनाच्या कुटुंबियांवर निशाणा साधली. यावर आता नेटकऱ्यांनी देखील स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे.

Samay Raina : पती - बेटे नल्ले है..., समर रैनाकडून सरळ चारचौघात अर्चनाच्या नवऱ्या-मुलांचा अपमान! VIDEO व्हायरल
Samay Raina
| Updated on: Aug 29, 2026 | 12:46 PM

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंटच्या वादानंतर कॉमेडियन समय रैना वादाच्या भोवऱ्यात अडकलेला. पण आता समय याने दमदार कमबॅक केलं आणि ‘इंडियाज गॉट लेटेंट सीजन 2’ नंतर समय याची चांगली वेळ आली आहे. शोच्या नुकताच झालेल्या एपिसोडमध्ये सोशल मीडिया स्टार ऑरी, अर्चना पूरन सिंह आणि शेरोन वर्मा प्रमुख पाहूणे म्हणून आलेले. या तिघांमध्ये समय याचे अर्चना हिच्यासोबत चांगले संबंध आहेत. कदाचित हेच कारण आहे, ज्यामुळे समय याने अर्चना हिची सर्वात जास्त खिल्ली उडवली. एपिसोडचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये समय, अर्चनाला म्हणतो, ‘मी तुमचे ब्लॉग पाहिले आहे. तुझा नवरा काही काम करत नाही आणि तुझी दोन मुलं देखील काही काम करत नाहीत. ते काहीच कामाचे नाहीत. आज देखील येथेच बसलेले आहेत…’, यावर अर्चना हसते आणि मुलांना म्हणते, ‘मी तुम्हाला सांगितलं होतं की, पुढे बसू नका. तुम्हाला अशा प्रकारची प्रसिद्धी मिळवायची नाही. अशा प्रकारे तुम्ही फक्त स्वतःचा अपमान करता… ‘, असं देखील अर्चना म्हणाली.

 

 

पुढे समय, अर्चनाच्या मुलांना म्हणतो, ‘तुम्हाला माहिती तरी आहे का, की लोकप्रियता कशी मिळवायची असते…?’ त्यानंतर अर्चना मोठ्याने हसू लागते…., याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाली, ‘हे विनोदी नाहीये… हा एक प्रकारचा अपमानच आहे.’, अन्य एका नेटकऱ्यांने लिहिलं, ‘मुलांबद्दल वक्तव्य फार खासगी होतं…’, एकाने लिहिलं हे फार अपमानजनक आहे…, सध्या सर्वत्र फक्त समय रैना आणि अर्चना पुरन सिंग यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

अर्चना पुरन सिंग हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अर्चना मुलांसोबत देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us