RCB Won IPL 2025 : अनुष्का शर्माची ‘ती’ गोष्ट विराटसाठी ठरली लकी ? आरसीबीच्या विजयामुळे अनुष्काही भावूक

RCB Won IPL 2025: विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे गेल्या 18 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या संघाने पहिल्यांदाच आयपीएलची फायनल जिंकून ट्रॉफीवर नाव कोरलंय. सामना जिंकल्यानंतर विराट कोहली भावुक झाला, मैदानावर तो चक्क रडलाही.

RCB Won IPL 2025 :  अनुष्का शर्माची ती गोष्ट विराटसाठी ठरली लकी ? आरसीबीच्या विजयामुळे अनुष्काही भावूक
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
Image Credit source: social media
| Updated on: Jun 04, 2025 | 9:13 AM

Virat Kohli – Anushka Sharma : आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करून 18 वर्षांचे स्वप्न पूर्ण केले आहे. विराटच्या संघाने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. सामना जिंकल्यानंतर विराट भावुक झाला. मैदानावर असतानाच त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि विजायनंतर तो चक्क मैदानावरच रडू लागला. त्याला पाहून अनेक चाहतेही भावूक झाले होते. मात्र आरसीबीच्या या विजयामुळे विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा खूपच खुश होती, तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट झळकत होता. आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून अनुष्का विराटचे बहुतेक सामने पाहण्यासाठी आली होती. अनुष्का ही विराटची लकी चार्म आहे. दरम्यान तिची ‘ही’ खास गोष्ट विराटसाठी अंतिम सामन्यात लकी ठरल्याचे बोलले जात आहे.

आयपीएलच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये देखील अनुष्का शर्मा ही विराटला पाठिंबा देण्यासाठी गेली होती. पहिला क्वालिफायर सामना आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातच खेळला गेला होता. त्या सामन्यात अनुष्काने जे काही केले, तेच तिने अंतिम सामन्यातही केले. अनुष्काचा एक शर्ट विराटसाठी लकी ठरला अशी चर्चा आहे.

व्हाईट शर्ट विराटसाठी लकी ?

आयपीएलच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये अनुष्का शर्मा ही पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम घालून आली होती. ती स्टँडवरून विराटसाठी आणि आरसीबीसाठी चिअर करताना दिसली. तर काल (मंगळवारी) झालेल्या अंतिम सामन्यातही अनुष्काचा लूक असाच होता. कालही ती पांढरा शर्ट आणि डेनिम घालून आली होती. त्यामुळे अनुष्काचा पांढरा शर्ट विराटसाठी लकी ठरला असे बोलले जात आहे.

 

अनुष्काला मिठी मारून रडला विराट

काल आयपीएलची फायनल जिंकल्यावर विराट भरमैदानातच रडला होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे अनुष्का विराटला भेटण्यासाठी मैदानात आली, तेव्हा त्याने तिला घट्ट मिठी मारली. अनुष्का विराटचे अभिनंद करत असतानाच विराटच्या डोळ्यात तेव्हाही अश्रू आले होते. एवढंच नव्हे तर आरसीबी जिंकल्यानंतर अनुष्काच्या डोळ्यातही अश्रू होते आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. हे आनंदाश्रू होते, यात काहीच दुमत नाही.

 

विराटने अनुष्कालाही दिलं क्रेडिट

काल सामान जिंकल्यानंतर विराट कोहलीने आरसीबीच्या विजयाचे श्रेय अनुष्का शर्माला दिले आहे. विराट म्हणाला – ती 2014 पासून येथे येत आहे आणि आरसीबीला पाठिंबा देत आहे, म्हणून तिलाही 11 वर्षे झाली आहेत. ती सतत तिथे होती. सामन्यांना यायची,कठीण मॅचही तिने पाहिल्या, तिने आम्हाला हरताना पाहिलंय. तुमचा जीवनसाथी तुमच्यासाठी खेळण्यासाठी काय- काय करत असतो, त्याग, कमिटमेंट देतो आणि अडचणीत तुमच्यासाठी उपस्थित असतो. हे असे काहीतरी आहे जे तुम्ही शब्दात मांडू शकत नाही.’ असं म्हणत विराटने अनुष्काचंही कौतुक केलं.