
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच सुनिता अहूजला गोविंदापासून वेगळे व्हायचे असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता गोविंदाची पत्नी सुनिताने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मात्र, सुनावणीसाठी गोविंदा गैरहजर असल्याचे म्हटले जात आहे. सुनिताने गोविंदावर फसवणुकीचा आणि दुखावल्याचा आरोप केला आहे.
सुनिता अहूजाने नुकत्याच एका व्लॉगमध्ये गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांबाबत वक्तव्य केले होते. आता, नवीन माहितीनुसार, सुनिताने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तिने गोविंदावर ‘प्रेम आणि विवाहात फसवणूक, दुखावणे आणि वेगळे राहण्याच्या आधारावर घटस्फोट मागितला आहे. सुनिता अहूजाने हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 13 (1) (i), (ia), (ib) अंतर्गत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
वाचा: 5 बायका, 12 लफडी… तरीही एकाकी होऊन मेला हा बॉलिवूडचा महाखतरनाक व्हिलन, मृतदेहही सडला…
हाउटरफ्लायच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, कोर्टाने 25 मे रोजी गोविंदाला समन्स पाठवले होते आणि जूनपासून दोघेही हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनावणीदरम्यान सुनीता वेळेवर कोर्टात हजर राहत आहे, तर गोविंदा गैरहजर राहिला आहे. यापूर्वी सुनिताने तिच्या व्लॉगमध्ये घटस्फोटाच्या अफवांवर वक्तव्य केले होते.
सुनिता अहूजा मंदिरात जाताना दिसली होती. तिथे ती पुजाऱ्याशी बोलताना म्हणाली की, ती लहानपणापासून महालक्ष्मी मंदिरात जात आहे. पुढे रडत ती म्हणाली, “जेव्हा मी गोविंदाला भेटले, तेव्हा मी मातेकडे मागितले की, माझे लग्न त्याच्याशी व्हावे आणि मी आयुष्य सुखाने जगेन. मातेने माझ्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या. मला दोन्ही मुलेही दिली.”
सुनिता अहूजाने दिला शाप
सुनिता आहूजा पुढे म्हणाली, “पण प्रत्येक गोष्ट सहज मिळत नाही, आयुष्यात चढ-उतार येतात. पण माझा मातेवर विश्वास आहे. आज जर मी काही संकटांचा सामना करत असेन, तर मला माहित आहे की, जो कोणी माझे घर तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याला माता काली… ती बसून सर्वकाही पाहात आहे.”
सुनिताने कोणाला ठरवले घर तोडणारी
सुनिता पुढे म्हणाली, “एका चांगल्या माणसाला आणि चांगल्या स्त्रीला दुखवणे ही चांगली गोष्ट नाही. मी तिन्ही मातांची मनापासून पूजा करते. ज्या कोणी माझ्यावर ही परिस्थिती आणली आहे आणि जो कोणी माझे घर-कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याला माता माफ करणार नाही.”
गोविंदाचे 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरची चर्चा
या वर्षी फेब्रुवारीत, अनेक मीडिया अहवालांमध्ये दावा करण्यात आला की, गोविंदा आणि सुनिता आहूजा यांनी सततच्या मतभेदांमुळे आणि वेगवेगळ्या जीवनशैलीमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. असेही म्हटले गेले की, गोविंदाचे 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत वाढते जवळीकीचे संबंध हे त्यांच्या कथित विभक्त होण्याचे प्रमुख कारण आहे. नंतर, त्यांच्या वकिलानेही सांगितले की, या जोडप्याने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोसाठी अर्ज केला होता, परंतु आता ते पुन्हा एकत्र येण्याचा विचार करत आहेत.