मातीची भांडी, चूल, लाकडी छत; जॅकी श्रॉफ यांचं स्वयंपाकघर पाहिलं का? गावात राहिल्याची भावना

अभिनेता जॅकी श्रॉफचे मुंबईपासून दूर असलेले फार्महाऊस साधेपणा व नैसर्गिक जीवनशैलीचे प्रतीक आहे. त्यांच्या शेतातील स्वयंपाकघरात मातीची भांडी, लाकडी छत आणि चूलही आहे. त्यांचे घर गावात राहण्याची भावना देतं. जॅकी श्रॉफ त्यांच्या मातीशी जोडलेले आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे जॅकी श्रॉफ यांचं हे घर आहे.

Updated on: Oct 22, 2025 | 5:39 PM
1 / 9
बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हे त्यांच्या स्पष्ट बोलण्याबद्द तसेच त्यांच्या बिनधास्त वागण्याबद्दल ओळखले जातात. त्यांचे साधे राहणीमान, बोलणे, तसेच टपोरी भाषा हेच चाहत्यांना त्यांच्यातील सर्वात आवडणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळेच त्यांना सगळे जग्गूदादा म्हणतात. कारण सर्वांना ते आपल्यातले वाटतात. जॅकी यांना गावी राहायला, शेत, गावची माती याबद्दल खूप प्रेम आणि आपुलकी आहे.  त्याचे घर पाहिल्यावरही त्याची जाणीव होते. कारण त्यांचे फार्महाऊस हे गावची आठवण करून देणारेच आहे.

2 / 9
 जॅकी श्रॉफ यांना त्यांचा बहुतेक वेळ त्याच्या फार्महाऊसवर घालवायला आवडतो. मुंबईच्या गर्दीपासून दूर, त्यांनी एक अनोखे रिट्रीट तयार केले आहे जे नैसर्गिक सौंदर्यात आहे. जिथे प्राणी, पक्षी आणि इतरांसाठी निवासस्थान आहे.  फराह खानच्या नवीन व्हीलॉगमध्ये जॅकी श्रॉफचे आलिशान फार्महाऊस तिने दाखवले आहे, जिथे त्याच्यासोबत पक्षी आणि इतर प्राणी देखील पाहायला मिळतात.

3 / 9
जॅकी श्रॉफ यांच्या घरात कोणतीही महागडी भांडी नाही तर मातीची भांडी आहेत.  लाकडी छत आहे.  हे जॅकी श्रॉफ यांच्या शेतातील स्वयंपाकघर आहे.

4 / 9
जग्गू दादा त्यांच्या शेतातील भाज्या आणि पालेभाज्या स्वत: उगवतात आणि तेच वापरतात.

5 / 9
जॅकी श्रॉफ यांच्या स्वयंपाकघरात चूलही आहे. त्यांचा मदतनीस इथे स्वयंपाक करतो. जग्गू दादाला इथे बनवलेले जेवण खूप आवडते. त्यांना पारंपारिक भारतीय पद्धतीने राहणे आणि खाणे आवडते. त्यांच्या फार्महाऊसमध्ये पोपट, ससे, मांजरी आणि कुत्रे यांसारखे प्राणी देखील आहेत.

6 / 9
येथे, जॅकी श्रॉफ फराह खानला झाडाच्या पानांचा वापर करून भाजी कशी बनवायची हे शिकवतात. नेहमी प्रमाणे स्वयंपाकी दिलीप देखील तिच्या सोबत आहे. पालेभाज्या आणि वांग्याचं भरीत जॅकी यांनी त्यांना खाऊ घातलं.

7 / 9
दरम्यान जॅकी यांच्या घरात एका भिंतीवर  अभिनेते धर्मेंद्र, वहीदा रहमान अशा अनेक सेलिब्रिटींचे फोटो आहेत.

8 / 9
जॅकी श्रॉफ यांच्या घरात  सजावटीच्या वस्तू म्हणून ठेवलेला हा जग्गू दादांचा पुतळा आहे. सुरुवातीला फराह खानला वाटले की तिथे बसलेली एखादी व्यक्ती आहे.

9 / 9
 या फार्महाऊसमध्ये एक मोठा स्विमिंग पूल आहे आणि जॅकी आणि टायगर श्रॉफ बहुतेकदा त्यांचा बहुतेक वेळ येथे घालवतात