Jacqueline Fernandez | जॅकलीन फर्नांडीस हिचा मार्ग मोकळा, न्यायालयाकडून अभिनेत्रीला अत्यंत मोठा दिलासा

जॅकलीन फर्नांडीस ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असते. जॅकलीन फर्नांडीस हिची फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर जबरदस्त बघायला मिळते. जॅकलीन फर्नांडीस ही सोशल मीडियावर सक्रिय असते. जॅकलीन फर्नांडीस हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

Jacqueline Fernandez | जॅकलीन फर्नांडीस हिचा मार्ग मोकळा, न्यायालयाकडून अभिनेत्रीला अत्यंत मोठा दिलासा
| Updated on: Aug 16, 2023 | 4:54 PM

मुंबई : बाॅलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडलीये. जॅकलीन फर्नांडीस हिचे नाव मनी लाँडरिंग प्रकरणात आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणात जॅकलीन फर्नांडीस हिच्यावर अनेक आरोप देखील करण्यात आले. जॅकलीन फर्नांडीस हिचे मनी लाँडरिंग (Money laundering) प्रकरणात पाय खोलात असल्याचे अगोदरच स्पष्ट झाले. मनी लाँडरिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडीस हिची अनेकदा चाैकशी देखील करण्यात आली.

इतकेच नाही तर जॅकलीन फर्नांडीस हिला विदेशात जाण्यास देखील बंदी होती. सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत जॅकलीन फर्नांडीस हिला चक्क लग्न करायचे होते. 200 कोटीच्या मनी लाँडरिंग प्रकरणातील मुख्य आरोपी हा सुकेश चंद्रशेखर आहे. सुकेश चंद्रशेखर हा सध्या दिल्ली येथील तुरूंगात आहे.

फक्त जॅकलीन फर्नांडीस हिच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री या सुकेश चंद्रशेखर याच्या संपर्कात होत्या. यामध्ये नोरा फतेही हिच्या नावाचा देखील समावेश आहे. नुकताच आता जॅकलीन फर्नांडीस हिला कोर्टाकडून अत्यंत मोठा दिलासा हा देण्यात आलाय. जॅकलिन फर्नांडिस हिला न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आता पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनच्या जामिनाच्या अटींमध्ये बदल केले आहेत. यामुळे हा अभिनेत्रीला मोठा दिलासाच म्हणावा लागणार आहे. जॅकलीन फर्नांडीस हिला देश सोडण्यापूर्वी 3 दिवस अगोदर न्यायालय आणि ईडीला कळवावे लागणार आहे. न्यायालयाकडून जॅकलीन फर्नांडीसला मोठी सुट देण्यात आली आहे. जर जॅकलीन फर्नांडीस ही विदेशात चित्रपटाच्या कामासाठी जात असेल तर तिला परवानगी घेण्याची काही गरज पडणार नाहीये.

जॅकलीन फर्नांडीस हिला न्यायालयाकडे आणि ईडीकडे तिच्या प्रवासाबद्दल संपूर्ण माहिती देणे आता बंधनकारक ठरणार आहे. विशेष म्हणजे आता कोणत्याही देशात जॅकलीन फर्नांडीस जाऊ शकते, हे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, नेमक्या कोणत्या देशात जाणार आणि किती दिवस राहणार ही माहिती तिला द्यावी लागेल.

इतकेच नाही तर विदेशात कुठे राहणार याचा पत्ता आणि तेथील तिचा फोन नंबरही जॅकलीन फर्नांडीसला द्यावा लागेल. जॅकलीन फर्नांडीस ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. जॅकलीन फर्नांडीस हिची फॅन फाॅलोइंगही सोशल मीडियावर बघायला मिळते. मात्र, सुकेश चंद्रशेखर प्रकरणाताचा मोठा फटका जॅकलीन फर्नांडीस हिला बसला आहे.