
सध्या देशभरात कोरोनानं डोकं वर काढलंय. अशा परिस्थितीत प्रत्येक जण होईल तेवढी मदत करतंय.

अशात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं मदतीचा हात पुढे केलाय. तिनं समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतंच एका फाउंडेशनची सुरुवात केली. तिनं स्थापन केलेल्या 'यू ओन्ली लिव्ह वन्स' (YOLO) या फाउंडेशन अनेक स्वयंसेवी मिळून काम करणार आहे.

आता जॅकलिन मुक्या जनावरांसाठी पुढे सरसावली आहे. गरीब प्राणी माणसांसारखी मदत नाही मागू शकत त्यामुळे आपण त्यांची काळजी घ्यावी या हेतूने जॅकलिनने नुकतंच फिलाइन फाउंडेशनला भेट दिली.

या भेटीचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फिलाइन ही एक अशी सामाजिक संस्था आहे जे भटक्या जनावरांची मदत करते.

आपल्या YOLO फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरु ठेवत, तिनं नुकतंच रोटी बँक फाउंडेशनचा दौरा केला. जॅकलिन मुंबई पोलीस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात तिने भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेतला आहे.