Jacqueline Fernandes : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनला पुन्हा समन्स, 8 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

ईडीने जॅकलीनला आज पुन्हा समन्स बजावत 8 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ठग सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यात जॅकलीनचंही नाव समोर आल्यानं जॅकलीनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

Jacqueline Fernandes : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनला पुन्हा समन्स, 8 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश
jacqueline fernandez
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 6:41 PM

मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसच्या अडचणी पुन्हा वाढताना दिसून येत आहेत. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात जॅकलीनला ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे. सुकेश चंद्रशेखरमुळे जॅकलीन पुन्हा वादात सापडली आहे. सुकेश चंद्रशेखरवर मनी लाँड्रिंग आणि इतर काही गंभीर आरोप आहेत. रविवारी जॅकलीनला मुंबई विमानतळावरही अडवण्यात आलं होतं. ईडीच्या लुकआऊट नोटीसीनंतरही जॅकलीन भारताबाहेर निघाली होती. त्यावेळी तिला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं.

8 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

ईडीने जॅकलीनला आज पुन्हा समन्स बजावत 8 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ठग सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यात जॅकलीनचंही नाव समोर आल्यानं जॅकलीनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

ठग सुकेशबरोबरच्या फोटोचीही चर्चा

अलिकडेच जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना पहायला मिळालं. त्या फोटोतून सुकेश आणि जॅकलीनमध्ये किती जवळीकता होती हे स्पष्ट होत आहे. तर सुकेश अनेकदा जॅकलीनला भेटला होता आणि त्याने जॅकलीनला महागडे गिफ्ट दिल्याचाही आरोप आहे. सुकेशने जॅकलीनला आतापर्यंत तब्बल 10 कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याच्या चर्चा आहेत. त्यातल्या 52 लाखांच्या घोड्याची आणि 9 लाखाच्या मांजरीची जास्त चर्चा होत आहे.

नोरा फतेहीवरही कोट्यवधी खर्च केल्याचा आरोप

सुकेशने फक्त जॅकलीनवरच नाही तर नोरा फतेहीवरही खूप खर्च केल्याच्या चर्चा आहेत. त्यात एका बीएमडब्लू कार आणि आयफोनचा समावेश असल्याचं बोललं जाते. त्यामुळे या दोघींच्या बॉलिवूड करिअरवर परिणाम होऊ शकतो. आता हे प्रकरण जॅकलीनच्या अडचणी किती वाढवणार? हे चौकशीनंतरच कळेल.

OBC Reservation : ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती! भाजप नेते आक्रमक, ठाकरे सरकारवर हल्लाबोल

रहाणेच्या फॉर्मबाबत विराटचं थेट उत्तर; ‘मी त्याला जज करु शकत नाही, त्याला परिस्थितीची जाणीव’

चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न जीवाशी, रेल्वे पोलिसांच्या धाडसामुळे प्राण वाचले, पाहा धक्कादायक व्हिडीओ!