AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रहाणेच्या फॉर्मबाबत विराटचं थेट उत्तर; ‘मी त्याला जज करु शकत नाही, त्याला परिस्थितीची जाणीव’

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज अशी ओळख असलेल्या अजिंक्य राहणेचं कसोटी करिअर धोक्यात आलं आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे.

रहाणेच्या फॉर्मबाबत विराटचं थेट उत्तर; 'मी त्याला जज करु शकत नाही, त्याला परिस्थितीची जाणीव'
Virat Kohli - Ajinkya Rahane
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 6:24 PM
Share

मुंबई : भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज अशी ओळख असलेल्या अजिंक्य राहणेचं कसोटी करिअर धोक्यात आलं आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत पार पडलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने अजिंक्य रहाणेच्या दुखापतीचं कारण सांगत त्याला संघातून वगळलं आहे. मात्र क्रिकेटरसिकांमध्ये अजिंक्य रहाणेला संघ व्यवस्थापनाने डच्चू दिल्याचीच अधिक चर्चा आहे. गेल्या वर्षभरातील अजिंक्य रहाणेची कामगिरी पाहता त्याचं क्रिकेट करिअर धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अजिंक्यच्या फॉर्मबाबत कर्णधार विराट कोहलीला विचारले असता त्यावर थेट उत्तरं दिली. (Virat Kohli on Ajinkya Rahane form; says I cant judge him only He knows what he’s going through)

विराट म्हणाला की, “रहाणेचा फॉर्म मी जज करु शकत नाही. मीच काय इतर कोणीही ते करु शकत नाही. रहाणेला विश्वास आणि पाठिंब्याची गरज आहे, जेणेकरून त्याला त्याच्यासमोरील अडचणींवर मात करता येईल. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा 1-0 असा पराभव केल्यानंतर कोहलीने काही कठीण मुद्द्यांवर भाष्य केले. त्यात त्याच्या फॉर्मविषयीदेखील तो व्यक्त झाला. विराट कोहली म्हणाला की, या महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी संघ निवडीबाबत चर्चा होईल.”

रहाणेच्या फॉर्मच्या प्रश्नावर विराट कोहली पत्रकारांना म्हणाला, “मी त्याचा फॉर्म जज करू शकत नाही. इतर कोणीही ते करू शकत नाही. आता तो कोणत्या परिस्थितीतून जातोय हे केवळ त्यालाच माहीत आहे.” गेल्या 12 कसोटीत रहाणेची सरासरी 20 पेक्षा कमी आहे. अशा स्थितीत संघातील त्याच्या जागेला धोका निर्माण झाला आहे. मात्र विराटला वाटते की, “रहाणेची जुनी कामगिरी लक्षात ठेवावी लागेल आणि त्याला सुरक्षित वाटले पाहिजे, असे वातावरण असले पाहिजे.”

विराट म्हणाला, “त्याने (अजिंक्य) याआधी संघासाठी खूप योगदान दिलं आहे. अशा वेळी आपण त्याला पाठिंबा देणे आवश्यक आहे. आम्हाला अशा वातावरणाची गरज नाही जिथे खेळाडू स्वतःला असुरक्षित मानतील. अशा प्रकारच्या वातावरणात टीम काम करु शकणार नाही.”

आम्ही बाहेरच्या लोकांच्या हिशेबाने खेळत नाही : विराट

विराट कोहली म्हणाला की, “आमचा संघ बाहेरच्या खेळाडूंप्रमाणे वागू शकत नाही. जेव्हा बाहेरचे लोक एखाद्या खेळाडूची स्तुती करतात तेव्हा ते त्याची खूप प्रशंसा करत सुटतात आणि नंतर जेव्हा तो अपयशी ठरतो तेव्हा त्याला फटकारतात. आम्ही खेळाडू म्हणून केवळ संघात काय घडतंय याकडेच लक्ष देतो. खेळाडूंच्या मनात काय चाललंय, बाहेर काही गोष्टी घडत असतात, त्याचा परिमाण आमच्या खेळावर होऊ देत नाही. आम्ही संघातील प्रत्येकाला सपोर्ट करतो, मग तो अजिंक्य असो किंवा इतर कोणीही. बाहेर जे काही घडतंय यावर आधारित आम्ही निर्णय घेत नाही.”

इतर बातम्या

IND vs NZ : टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, किवी संघाने हिरावलेलं पहिलं स्थान परत मिळवलं

ND vs NZ, 2nd Test : मयंकचं शतक, अश्विन-जयंतचे ‘चौकार’, मुंबई कसोटीत भारताचा 372 धावानी शानदार विजय

IND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं?

(Virat Kohli on Ajinkya Rahane form; says I cant judge him only He knows what he’s going through)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.