AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhavi Killekar: मला बिस्लेरीच्या पाण्यानं आंघोळ करावी लागली…जान्हवी किल्लेकरवर अशी वेळ का ओढवली?

Janhavi Killekar Kolhapur : जान्हवी किल्लेकर हिने सायको रंगा चित्रपटाच्या प्रमोशना दरम्यान कोल्हापूरातील एका प्रसंगाबद्दल बोलून दाखवले आहेत.

Janhavi Killekar: मला बिस्लेरीच्या पाण्यानं आंघोळ करावी लागली...जान्हवी किल्लेकरवर अशी वेळ का ओढवली?
| Updated on: Sep 26, 2026 | 11:18 AM
Share
गेल्या काही दिवसांपासून ‘ सायको रंगा ‘ या मराठी चित्रपटाची बरीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारही  दिसणार आहेत. सिनेमात स्मिता गोंदकर, जान्हवी किल्लेकर , सुबोध भावे, पुष्कर जोग, मिलिंद शिंदे अशा कलाकार झळकणार आहेत. याच सिनेमाचे प्रमोशन सध्या सुरु आहे. या प्रमोशन निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी किल्लेकरने शूटिंग दरम्यानच्या काही एक किस्सा बोलून दाखवला ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
सिनेमाबद्दल बोलत असताना जान्हवीने सांगितले की, “मी कोल्हापुरात शूटिंग करताना बिस्लेरीच्या पाण्यानेच अंघोळ करते.” तिने सांगितलेला किस्सा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  अभिनेता पुष्कर जोग याने या सिनेमाबद्दल आधी ही बऱ्याच गोष्टी बोलून दाखवल्या होत्या.
“कोल्हापुरमध्ये शूटिंग होते तेव्हा टेन्शन आले होते. कारण मला स्क्रीन प्रॉब्लेम खूप आहेत. मी फूडी नाहीये, पण बाहेर कुठे गेलात तर तिथले क्लायमेट मला लगेच सूट होत नाही. कोल्हापूरचे पाणी मला सूट होचत नाही.  मुंबईच्या पाण्याची आता सवय झालीये ना. तर आता कसे मॅनेज करतायत, असे वाटले होते. मी अंघोळ चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली. कोल्हापूरचे पाणी चांगलेच आहे पण आपली स्कीनच अशी आहे, त्याला आता काय करायचे? मोठे मोठे पाण्याचे बॉटल आणायचे, तेही मी माझ्या खर्चातून.” असं ती म्हणाली.
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपट प्रदर्शित होत आहे. याच मालिकेमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ‘सायको रंगा’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. दमदार अ‍ॅक्शन, गूढ कथानक आणि भावनिक संघर्षाची जोड असलेला हा सिनेमा लोकांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटातील मुख्य पात्र ‘रंगा’ हा अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला एक रोबिन हूड पद्धतीचा नायक म्हणून दाखवण्यात आला आहे.  तो नक्की ‘सायको’ आहे की परिस्थितीने त्याला तसं बनवलंय, हे आता चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?