
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहेत. दोघांच्या लग्नाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न 2007 मध्ये झाले. यांच्या लग्नावेळी खूप मोठी विघ्न आल्याचे बघायला मिळाले. अभिषेक ऐश्वर्याच्या लग्नाच्या दिवशी जान्हवी कपूरने मोठा धिंगाना घातला होता. हेच नाही तर मोठा आरोप करत थेट म्हटले की, ऐश्वर्या रायने माझा पती चोरला आहे. यादरम्यान जान्हवी कपूरने आपल्या हाताची नस देखील कापली. अभिषेक बच्चनसोबत माझे लग्न झाल्याची ती परत परत सांगताना दिसली. ऐश्वर्या राय आणि अभिषेकचे लग्न सुरू असताना विवाहस्थळी देखील ती पोहोचली होती.
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नात धिंगाना घालणारी ही जान्हवी कपूर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर नाही तर एक मॉडेल आहे जिने अभिषेक बच्चन याच्यासोबत दस या चित्रपटात एकत्र काम केले होते. या मॉडेल जान्हवी कपूर हिने ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नामध्ये मोठा धिंगाना घातला होता. ज्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. फक्त हेच नाही तर हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते.
अभिषेक बच्चन आणि माझे लग्न अगोदरच झाले असल्याचा दावा तिने केला. मात्र, पुढे काहीच होऊ शकले नाही. तिच्याकडे काहीच पुरावे अभिषेक आणि तिच्या लग्नाचे नव्हते. यामुळे पोलिसांनी या प्रकरणात तक्रार देखील घेतली नव्हती. अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न प्रतिक्षा या बंगल्यात झाले. जान्हवी कपूरने प्रतिक्षा बंगल्यात प्रवेश केला आणि तिथे तिने धिंगाणा घालण्यास सुरूवात केली.
अभिषेक माझा पती आहे… आमच्या दोघांचे लग्न अगोदरच झाले आहे.. ऐश्वर्या राय हिने माझा पती चोरला आहे… असे म्हणत तिने थेट आपल्या हाताची नस कापली होती. यानंतर प्रतिक्षा बंगल्यात एकच खळबळ उडाली. यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. शेवटी पोलिसांनी याप्रकरणात हस्तक्षेप केला होता.