
मुंबई : 24 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री जान्हवी कपूर हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये वेग – वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. नुकताच अभिनेत्री ‘बवाल’ सिनेमा प्रदर्शित झाला. जान्हवी हिने ‘धडक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत चाहत्यांना घायाळ केलं. अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत जान्हवीने अनेकांच्या मनात घर केलं. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. पण जान्हवी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. एक वेळ अशी आली होती जेव्हा जान्हवी हिला भाजप नेत्या स्मृती इराणी यांची माफी मागावी लागली. भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील पोस्ट केला होता.
स्मृती इराणी आणि जान्हवी कपूर यांच्या एका भेटीचा हा व्हिडीओ आहे. या भेटीदरम्यान जान्हवीने स्मृती यांना आण्टी म्हणून हाक मारली. त्यानंतर जान्हवीने प्रेमाने त्यांची माफी देखील मागितली. याबाबत स्मृती यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. शिवाय कॅप्शनमध्ये ‘ही आजकालची मुलं…’असं देखील म्हटलं आहे.
जान्हवी हिच्यासोबत व्हिडीओ पोस्ट करत स्मृती इराणी म्हणाल्या होत्या की, “कुणीतरी मला गोळी मारावी असा क्षण, जेव्हा जान्हवी कपूरने वारंवार आण्टी म्हटल्यानंतर प्रेमाने माफी मागितली आणि तुम्हाला म्हणावं लागलं – इट्स ओके बेटा’, ही आजकालची मुलं…” असं म्हणत स्मृती इराणी यांनी #आण्टीकिसकोबोला असं कॅप्शन देखील लिहिलं… आजही स्मृती इराणी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्मृती इराणी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा स्मृती इराणी टीव्ही विश्वावर राज्य करत होत्या. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ सिनेमात त्यांनी तुलसी ही भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक वर्ष मालिकेने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता स्मृती इराणी राजकारणात सक्रिय आहेत.
जान्हवी कपूर हिची लोकप्रियता
जान्हवी कपूर लवकरच ‘दोस्ताना 2’ आणि ‘मिस्टर एन्ड मिसेज माही’ सिनेमातून देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र जान्हवी हिच्या आगामी सिनेमांची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर जान्हवी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.