Video: जान्हवी कपूरने भर रॅम्पवर ड्रेसचा बंद सोडलला अन्… व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे जान्हवी कपूर चर्चेत आहे.

Video: जान्हवी कपूरने भर रॅम्पवर ड्रेसचा बंद सोडलला अन्... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Janhvi Kapoor
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Mar 31, 2025 | 7:24 PM

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायम चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड लूकमुळे तर कधी सिनेमांमुळे. नुकताच जान्हवी कपूर एका कार्यक्रमात पोहोचली होती या कार्यक्रमासाठी तिने अतिशय ग्लॅमरस लूक केला होता. या कार्यक्रमातील जान्हवीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवीने जॅकेटचा बंद सोडला आहे आणि फोटोसाठी पोझ दिली आहे.

जान्हवी कपूरने नुकताच लॅकमे फॅशन विकला हजेरी लावली. अभिनेत्री जान्हवी कपूरने या कार्यक्रमात रॅम्प वॉक केला होता. तिने डिझायनर राहुल मिश्राने डिझाइन केलेला ड्रेस या रॅम्पवॉकसाठी घातला होता. या काळ्या रंगाच्या बॉडीकॉर्न ड्रेसवर छोटी-छोटी फुले आहेत. ड्रेसला स्ट्रॅपलेस ठेवण्यात आले आहे. तसेच ड्रेसला थाय हाय स्लिट कट देखील देण्यात आला आहे. या काळ्या रंगाच्या बॉडीकॉर्न ड्रेसवर जान्हवीने न्यूड मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये जान्हवी अतिशय हॉट दिसत आहे.

काय आहे व्हिडीओ

सोशल मीडियावर लॅक्मे फॅशन विकमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये जान्हवीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. जान्हवीने घातलेल्या काळ्या बॉडी कॉर्न ड्रेसवर काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. ती रॅम्पवर वॉक करत असताना फोटोग्राफर्सला पोज देत असते. पोज देत असताना तिने जॅकेटचा बंद सोडला आणि ते बाजूला काढून ठेवले. त्यानंतर काळ्या बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये जान्हवी अतिशय हॉट दिसत होती.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

या फॅशन शोचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते जान्हवीचे कौतुक करत आहेत. कोणीतरी तिला ‘बॉलिवुडची फॅशन दिवा’ म्हटले तर कोणीतरी सांगितले की ती पुढची मोठी सुपरस्टार बनण्याच्या मार्गावर आहे. एका यूजरने लिहिले – ‘जान्हवी कपूरचा हा लूक आतापर्यंतचा सर्वोत्तम लुक आहे.’