Javed Akhtar Post: हिजाब वादावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले नितीश कुमार यांनी…

Javed Akhtar Post: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुस्लिम महिलेचा हिजाब ओढल्याच्या प्रकरणामुळे वाद पेटला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सनी त्यांच्यावर टीका केली आहे. आता जावेद अख्तर यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Javed Akhtar Post: हिजाब वादावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले नितीश कुमार यांनी...
Javed Akhtar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 18, 2025 | 3:47 PM

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यांवर सर्वत्र जोरदार टीका होत आहे. त्यांनी एका कार्यक्रमात मुस्लिम महिलेचा हिजाब ओढल्यामुळे अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. हिजाब प्रकरणाने आता जोर धरला आहे आणि यावर अनेक सेलेब्सनी प्रतिक्रिया देताना दिसत आहे. झायरा वसीम, राखी सावंत आणि सना खान यांच्या पाठोपाठ जावेद अख्तर यांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नितीश कुमार यांना चांगलेच सुनावले आहे.

काय म्हणाले जावेद अख्तर?

जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. जे लोक मला ओळखतात, त्यांना माहिती आहे की मी पडद्याच्या पारंपरिक संकल्पनेचा किती विरोधक आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी कधीही हे मान्य करेन की श्री नीतीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरसोबत जे केले ते बरोबर आहे. मी याची कठोर शब्दांत निंदा करतो. श्री नीतीश कुमार यांनी त्या महिलेची माफी मागायला हवी या आशयाची पोस्ट जावेद अख्तर यांनी केली आहे.

जावेद अख्तर यांच्या आधी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी जावेद अख्तर यांच्या वागणूकीवर राग व्यक्त केला आहे. झायरा वसीम यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला होता. त्यांनी लिहिले होते की, ‘महिलांची प्रतिष्ठा आणि मर्यादा काही खेळ नाही… ज्यासोबत सहज कोणाला खेळता येईल… विशेषतः सार्वजनिक मंचावर तर बिलकूल नाही… एक मुस्लिम महिला म्हणून, दुसऱ्या महिलेचा बुरखा इतक्या सहजपणे ओढलेला आणि त्याकडे हास्यासह पाहणे खूपच संतापजनक होतं. सत्ता मर्यादेचं उल्लंघन करण्याची परवानगी कधीच देत नाही…. नितीश कुमार यांनी त्या महिले माफी मागायला हवी..’

नेमकं प्रकरण काय?

15 डिसेंबर रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे देत होते. दरम्यान, एक हिजाब घालून महिला आली. प्रमाणपत्र देताना नितीश कुमार यांनी तिला हिजाब हटवण्यास सांगितले आणि तो हाताने खाली ओढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी राग व्यक्त केला.