
Javed Akhtar On Sonam Raghuvanshi- Muskan Rastogi case: देशातील वादग्रस्त प्रकरण राजा – सोनम रघुवंशीने स्वतःचा गुन्हा कबूल केला तेव्हा अनेकांनी सोनम हिच्यावर टीका केली. लग्नाच्या काही दिवसांनंतर सोनम हिने पती राजा रघुवंशी याची हत्या केली आणि स्वतः गायब झाली. सोनम हिने स्वतःचा गुन्हा कबूल केल्यानंतर अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, प्रसिद्ध संगीतकार जावेद अख्तर यांनी यावर स्वतःचं मत मांडलं आहे.
जावेद अख्तर म्हणाले, सोनम हिला कोणी विचारलं का तिला हे लग्न करायचं होतं नव्हतं… लहान शहरांमध्ये राहणाऱ्या मुलींसाठी आई – वडिलांना आपल्या आवडत्या मुलांबद्दल सांगणं सोपं असतं का, मुलीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं आहे? असं मुली सांगू शकत नाहीत…
सोनम रघुवंशी आणि मुस्कान रस्तोगी प्रकरणावर जावेद अख्तर म्हणाले, ‘या दोन महिलांना स्वतःच्या नवऱ्यांना जीवे मारलं आणि समाजाला मोठा धक्का बसला. पण समाज तेव्हा गप्प राहतो जेव्हा महिलांना जिवंत जाळलं जातं आणि त्यांची मारहाण केली जाते.
समाजाच्या दुहेरी मानसिकतेवर देखील जावेद अख्तर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समाज निर्लज्ज आहे. जो पुरुषांनी महिलांवर केलेल्या अत्याचारांवर गप्प राहतो पण महिला हिंसाचार करतात तेव्हा लगेच प्रतिक्रिया देतो… असं देखील जावेद अख्तर म्हणाले.
सांगायचं झालं तर, बॉलिवूडचे दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर कायम त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या सर्वत्र जावेद अख्तर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
राजा रघुवंशी याची हत्या – पत्नी सोनम रघुवंशी हिने प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत मिळून लग्नाच्या काही दिवसांनंतर नवऱ्याला मारलं. राजा रघुवंशी याचा मृतदेह मेघालय मधील चेरापुंजी याठिकाणी एका धबधब्याच्या जवळ सापडले. राजा रघुवंशी यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली होती.
मुस्कान रस्तोगी प्रकरण- मुस्कानने तिचा प्रियकर साहिल शुक्लासोबत मिळून तिचा पती सौरभ राजपूतची हत्या केली आणि शरीराचे तुकडे सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये लपवले.