माही सोबत घटस्फोटाच्या चर्चा… दुसऱ्याच तरुणीसोबत जय भानुशाली स्पॉट… काय आहे व्हायरल फोटो मागील सत्य?

Jay Bhanushali Divorce Rumors with Mahhi vij : पत्नी आणि 6 वर्षांच्या मुलीला सोडून जय भानुशाली दुसऱ्याच मुलीसोबत स्पॉट... घटस्फोटाच्या चर्चाांना उधाण आलेलं असताना अभिनेत्याचा फोटो व्हायरल... काय आहे व्हायरल फोटो मागील सत्य?

माही सोबत घटस्फोटाच्या चर्चा... दुसऱ्याच तरुणीसोबत जय भानुशाली स्पॉट... काय आहे व्हायरल फोटो मागील सत्य?
Jay Bhanushali
| Updated on: Dec 15, 2025 | 10:24 AM

Jay Bhanushali Divorce Rumors with Mahhi vij : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता जय भानुशाली फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून जय फक्त त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली. अभिनेत्री माही विज हिच्या लवकरच अभिनेत्याचं घटस्फोट होणार… अशा चर्चांनी देखील जोर धरलेला. पण दोघांनी देखील सर्व चर्चा फेटाळल्या आणि नात्यात सर्वकाही सुरळीत आहे… असं सांगितलं… दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, जय याचा एका तरुणीसोबत फोटो व्हायरल होत आहे. दुसऱ्याच मुलीसोबत फोटो व्हायरल होत असल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

ज्या मुलीसोबत जय भानुशाली याचा फोटो व्हायरल होत आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, ‘बिग बॉस 15’ कंटेस्टेंट मायशा अय्यर आहे… ‘बिग बॉस 15’ शोमध्येच जय भानुशाली आणि माही यांच्यामध्ये मैत्री झाली… पण आता फोटो समोर आल्यामुळे सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये अनेक चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहे.

 

 

सांगायचं झालं तर, फोटोमागील सत्य डेटिंगच्या अफवांच्या बिलकूल उलट आहे. मायशा अय्यर हिने जय भानुशाली याला राखी बांधली होती. दोघांमध्ये भाऊ – बहिणीचं नातं आहे… खुद्द माही देखील मायशा हिला सोशलम मीडियावर फॉलो करते…

जय भानुशाली – माही विज

जय भानुशाली आणि माही विज यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर जय आणि माही यांनी 2011 मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आता देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जय आणि माही यांना तीन मुलं आहे. तारा ही त्यांची मुलगी आहे तर, दोन मुलांना त्यांनी दत्तक घेतलं आहे…

घटस्फोटाच्या चर्चांना काय म्हणालेली माही?

घटस्फोटाच्या चर्चा रंगल्यानंतर माही म्हणाली, ‘आपच्या गोपनीयतेचा, आमच्या मुलांच्या, आमच्या कुटुंबाच्या आणि पालकांच्या गोपनीयतेचा आदर करा. जर कधी कोणाला सांगण्याची गरज भासली तर आम्ही स्वतः ते नक्की सांगू. जय माझं कुटुंब आहे आणि कायम राहिल… तो माझ्या मुलांचा बाप आहे… आणि एक चांगला व्यक्ती देखील आहे…’ असं देखील माही म्हणाली.