घाणेरडी पँट घातलेले विचित्र लोक उंदरासारखे…, संतापात असं कोणाला म्हणाल्या जया बच्चन? Video सर्वत्र व्हायरल

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी कोणाची थेट उंदरांशी तुलना केली? म्हणाल्या, 'उंदरांसारखे आहेत, जे कोणाच्याही घरात घुसतात...', नक्की काय आहे प्रकरण? जया बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

घाणेरडी पँट घातलेले विचित्र लोक उंदरासारखे..., संतापात असं कोणाला म्हणाल्या जया बच्चन? Video सर्वत्र व्हायरल
अभिनेत्री जया बच्चन
Updated on: Dec 01, 2025 | 9:49 AM

Jaya Bachchan : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन आणि पापाराझींचा छत्तीसचा आकडा आहे.. पापाराझींवर भडकताना जया बच्चन यांना अनेकदा पाहण्यात आलं आहे. आता देखील त्यांनी जया बच्चन यावर प्रतिक्रिया दिली आहे. बरखा दत्त यांचा We The Women शो मध्ये जया बच्चन यांनी पापाराझांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय, माध्यमांसोबत असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल देखील सांगितलं आहे.

पापाराझींसोबत नातं कसं आहे? असा प्रश्न जया बच्चन यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, ‘माध्यमांसोबत माझं नातं फार चांगलं आहे. मी माध्यमांचं प्रॉडक्ट आहे. पण पापाराझींशी माझं नातं पूर्णपणे शून्य आहे. हे लोक कोण आहेत? त्यांना या देशातील लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रशिक्षित केलं आहे का? तुम्ही त्यांना मीडिया म्हणता? मी मीडियामधून आहे. माझे वडील पत्रकार होते. मला माध्यमांचा खूप आदर आहे.”

‘पण बाहेर उभे असलेले घाणेरडी पँट घातलेले विचित्र लोकल मोबाईल घेऊन असतात आणि त्यांना वाटतं आपण फोटो काढू शकतो… आणि नको त्या कमेंट करत असतात.. कोणत्या प्रकारची लोकं आहेत ही? कुठून येतात, त्यांचं काय शिक्षण आहे.. बॅकग्राउंड काय आहे? ते आमचे प्रतिनिधित्व करतील, फक्त कारण ते YouTube वर आहेत किंवा कोणत्याही सोशल नेटवर्कवर आहेत. मी कोणत्याही सोशल नेटवर्कवर नाही, म्हणून मला माहित नाही.

 

 

एवढंच नाही तर जया बच्चन यांनी पापाराझांची तुलना उंदरांसोबत देखील केली. ‘हे खूपरंजक आहे. दिल्लीतील माझ्या एका स्टाफ मेंबरने सांगितले की, ती कोणतेही सोशल नेटवर्क वापरत नाही कारण सोशल मीडियावर मला सर्वात जास्त ट्रोल केलं जातं… यावर मी तिला म्हणाले, याचा मला काहीही फरक पडत नाही. हे तुमचं मत आहे… आणि मला तर तुम्ही बिलकूल नाही आवडत… तुम्ही (पापाराझी) त्या उंदरांसारखे आहेत, जे मोबाईल घेऊन कोणाच्याही घरात घुसतात…’

सेलिब्रिटी पापाराझींना पैसे देतात

सध्या अनेक तरुण कलाकार पापाराझींना पैसे देतात असा प्रश्न देखील जया बच्चन यांना विचारण्यात आला. यावर जया बच्चन यांनी असहमती दर्शवली आणि म्हणाल्या, मी अशा कोणत्याच सेलिब्रिटीला ओळखत नाही, ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलत आहात… माझा नातू (अगस्त्य बच्चन) अद्याप सोशल मीडिया नाही. जर तुम्हाला पैसे देऊन पापाराझींना बोलवावं लागत असेल तर, तुम्ही सेलिब्रिटी कसले.. असं देखील जया बच्चन म्हणाल्या.