‘बस्स आता खूप झालं…’, पापाराझींवर पुन्हा भडकल्या Jaya Bachchan; व्हिडीओ व्हायरल

सर्वांसमोर पापाराझींवर भडकल्या Jaya Bachchan... व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी साधला अभिनेत्रीवर निशाणा... पाहा व्हिडीओ... सध्या सर्वत्र जया बच्चन यांची चर्चा

बस्स आता खूप झालं..., पापाराझींवर पुन्हा भडकल्या Jaya Bachchan; व्हिडीओ व्हायरल
Jaya Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 22, 2023 | 10:03 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) कायम त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत असतात. अनेकदा जया बच्चन यांना पापाराझींवर भडकताना पाहिलं आहे. आता देखील जया बच्चन पापाराझींवर भडकल्या आहेत. ज्यामुळे नेकऱ्यांनी जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. नुकताच जया बच्चन मुलगी श्वेता बच्चन हिच्यासोबत आदित्य चोप्रा याच्या घरी पोहोचल्या होत्या. श्वेता आणि जया बच्चन यांना पाहिल्यानंतर त्यांची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी पुढे आहे. तेव्हा पापाराझींवर जया बच्चन भडकल्या. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी जया बच्चन यांचा विरोध देखील केला आहे.

वीरल भयानी याने त्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जया बच्चन पुन्हा पापाराझींवर भडकताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जया पापाराझींनी लांब उभं राहण्यासाठी सांगत आहेत. एवढंच नाही तर, फोटो आणि व्हिडीओ क्लिक करत असल्यामुळे पापाराझींना जया बच्चन रागावताना देखील व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

 

 

सोशल मीडियावर जया बच्चन यांचा असा स्वभाव पहिल्यांदा चर्चेत आलेला नसून, याआधी देखील अनेकदा पापाराझींवर भडकताना जया बच्चन यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘माध्यामांचा शत्रू…’, अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘त्यांना नक्की त्रास तरी कोणता आहे… पहिल्यांदा असं झालेलं नाही…’ सध्या सर्वत्र जया बच्चन यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, श्वेता आणि जया बच्चन एकत्र दिसत आहेत. पामेला चोप्राच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी जया आणि श्वेता बच्चन आल्या होत्या. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये जया आणि श्वेता दोघी पांढऱ्या सूटमध्ये दिसल्या. वयाच्या ७४ व्या वर्षी यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील जया बच्चन यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. का अज्ञात व्यक्तीने जया बच्चन यांचे न सांगता फोटो काढल्यामुळे अभिनेत्री प्रचंड भडकल्या. एवढंच नाही तर त्यांनी अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे… असं देखील म्हणाल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.