Jaya Bachchan: म्हातारी कोणाशी तरी नीट वागली; जया बच्चन यांनी गुलजार यांना मारली मिठी, व्हिडीओ तुफान व्हायरल

Jaya Bachchan: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांनी गुलजार साहेबांना मिठी मारली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Jaya Bachchan: म्हातारी कोणाशी तरी नीट वागली; जया बच्चन यांनी गुलजार यांना मारली मिठी, व्हिडीओ तुफान व्हायरल
Jaya Bachchhan
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 04, 2026 | 10:08 AM

मुंबईत आयोजित एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात अभिनेत्री जया बच्चन, महानायक अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध लेखक-गीतकार गुलजार एकत्र दिसले. यावेळी जया बच्चन केवळ कॅमेऱ्यासमोर पोज देतानाच नव्हे, तर खुल्या मनाने हसतानाही दिसल्या. त्यांचा हा आनंदी अंदाज सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच त्यांनी केलेल्या कृत्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेहमी चिडणाऱ्या, कोणाशीही न बोलणाऱ्या जया बच्चन यांनी थेट गुलजार यांना कडकडून मिठी मारली. ते पाहून नेटकरीही चकीत झाले आहेत.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकत्र दिसले. अमिताभ यांनी जया यांचा हात धरून त्यांना स्टेजपर्यंत पोहोचण्यास मदत केली. कार्यक्रमात गुलजारही उपस्थित होते. तिघेही खूप खुश दिसत होते. गुलजार यांनी जया यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. गुलजार साहेबांच्या एका विनोदी गोष्टीवर जया बच्चन मनमोकळेपणाने हसल्या. शेजारी उभे असलेले अमिताभ बच्चनही हसू रोखू शकले नाहीत. जया आणि गुलजार यांच्यातील सहज संवाद पाहून अमिताभही न्याहाळत राहिले.

Loading...

जया बच्चन यांनी गुलजार यांना मारली मिठी

याच कार्यक्रमातील आणखी एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यात जया बच्चन यांनी गुलजार यांना घट्ट मिठी मारली आहे. व्हिडीओमध्ये अमिताभ आणि जया स्टेजवरून खाली उतरत असताना सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या पत्नी तिथे येतात. दोघे अमिताभ यांच्या पाया पडतात. त्याच वेळी जया तिथून निघून जातात आणि कॅमेरा दुसरीकडे वळतो. तिथे जया बच्चन आणि गुलजार एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसतात. दोघांमधील जिव्हाळ्याचे नाते या क्षणातून स्पष्ट झाले.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. अमिताभ, जया आणि गुलजार यांच्यातील बॉन्डिंग अनेकांना भावले आहे. तिन्ही दिग्गजांचे एकत्र दर्शन अनेकांसाठी खास अनुभव ठरला, तर जया यांचा आनंदी अंदाज या भेटीतील सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने, ‘म्हातारी कोणाशी तरी नीट वागली’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने मजेशीर अंदाजात अमिताभ बच्चन यांना सल्ला दिला आहे की, ‘हिच संधी आहे सर… घटस्फोट देऊन टाका.’ सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us