
अभिनेत्री आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी राज्यसभेत दमदार भाषण दिली आणि भारतील सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केली. जया बच्चन यांनी यावेळी भारतीय सरकारवर गंभीर आरोप केले आहे. सरकारचं फिल्म इंडस्ट्रीकडे लक्ष नसल्याचं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं. ‘सरकारचं लक्ष नसल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीची हत्या होत आहे… सरकारने दया करुन इंडस्ट्रीची गळचेपी करण थांबवावं…’ असं देखील जया बच्चन म्हणाल्या. शिवाय नुकतात सादर झालेल्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे.
नुकताच दिलेल्या भाषणात जया बच्चन यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘यावेळी बजेटमध्ये फिल्म इंडस्ट्रीसाठी कोणतीच तरतूद नाही. फिल्म इंडस्ट्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सिंगल स्क्रिन थिएटर्सची हत्या होत आहे आणि एक दिवस त्यांना टाळे लागतील…’
जया बच्चन म्हणाल्या, यापूर्वीच्या सरकारने अशाच चुका केल्या होत्या पण यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आज जीएसटीची गोष्ट बाजूला राहूद्या… सर्व सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद होत आहेत. प्रेक्षकांनी देखील थिएटर्सकडे पाठ फिरवली आहे. कारण सर्व गोष्टींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.’
‘सरकारने सादर केलेलं बजेट पाहून फिल्म इंडस्ट्रीकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे. इंडस्ट्रीमध्ये एका दिवसाच्या मजूरीवर काम करणारे देखील अनेक लोक आहेत. सिनेमे देशाला जोडून ठेवतात, एकत्र आणतात… असं असताना सरकारने इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष केलं आहे.’
पुढे जया बच्चन म्हणाल्या, ‘आज याठिकाणी फिल्म इंडस्ट्रिच्या वतीने बोलत आहे. त्यांच्याकडून विनंती करत आहे. कृपा करुन इंडस्ट्रीवर दया करा आणि इंडस्ट्रीला वाचव… ज्या प्रकारे बजट सादर झालं आहे, ते पाहिल्यानंतर इंडस्ट्री नष्ट होईल असं दिसत आहे. इंडस्ट्रीला कायम लक्ष्य केलं जातं….’ असं देखील जया बच्चन म्हणाल्या आहेत.
सांगायचं झालं तर, जया बच्चन कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनेक मुद्द्यांवर जया बच्चन स्वतःचं परखड मत मांडत असतात. ज्यामुळे जया बच्चन यांच्यावर टीका देखील होते. शिवाय त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.