AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉमेडी शो, अभद्र टिप्पणी… रागात आमिर खान म्हणाला, ‘असे विनोद करण्यासाठी मी 14 वर्षांचा नाही आणि…’

'असे विनोद करण्यासाठी मी 14 वर्षांचा नाही आणि...', अभद्र टिप्पणीवर आमिर खानचा संताप..., सध्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका एपिसोडमुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

कॉमेडी शो, अभद्र टिप्पणी... रागात आमिर खान म्हणाला, 'असे विनोद करण्यासाठी मी 14 वर्षांचा नाही आणि...'
| Updated on: Feb 12, 2025 | 12:12 PM
Share

समय रैना याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ नुकताच झालेल्या एका भागात युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वी मखीजा हिच्यासोबत अन्य लोकं देखील उपस्थित होते. पण शोमध्ये आई – वडिलांबद्दल अभद्र शब्दांचा उल्लेथ करण्यात आला. सांगायचं झालं तर, हा पहिला शो नाही ज्यामध्ये वाईट शब्दांचा वापर केल्यामुळे शो आणि कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकले. याआधी 2015 मध्ये एक शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्यावर अभिनेता आमिर खान याने वादग्रस्त वक्तव्य केलं.

सध्या ज्या शोबद्दल चर्चा रंगल आहे, त्या शोचं नाव ‘AIB’ असं होतं. 2015 मध्ये शोच्या एका एपिसोडमध्ये करण जोहर आणि अनेक कॉमेडियनने अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्यावर विनोद केले होते. दोघांची गर्लफ्रेंड, आकर्षक करियर शिवाय त्यांच्या लैंगिकतेवरही कमेंट्स केल्या होत्या. या कमेंट्स ऐकून लोकं आश्चर्यचकित झाले होते.

या प्रकरणानंतर अनेक तक्रारी दाखल झाल्या. धमक्या दिल्या होत्या. युट्युबवरून व्हिडिओही काढून टाकण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप लोकांनी केला. तेव्हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेकांनी विरोध देखील केला.

दरम्यान, एका अभिनेत्याने केलेली टीका तुफान चर्चेत आली. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आमिर खान आहे. ’25 शिव्या देऊन तुम्हाला वाटत असेल मी आनंदी आणि इंप्रेस होईल. तर शिव्यांमुळे इंप्रेस होण्याचं माझं वय निघून गेलं आहे. आता मी 14 वर्षांचा राहिलेलो नाही, जो शिव्या ऐकून हाहाहा हसेल…’

‘मला हसवायचं असेल तर, कोणाचं नाव न घेता… कोणाच्या भावना न दुखवता मला आनंदी करा. जर तुम्ही एखाद्याच्या रंगावर भाष्य केलं किंवा कोणाच्या लैंगिकतेवर टिप्पणी केली आणि असं वाटलं की मी तुमच्याबरोबर हसेन, तर मी त्यावर हसणार नाही… असं देखील अभिनेता म्हणाला. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादावर आमिर खानचे हे शब्द विनोदाची रेषा कुठे ओढली पाहिजे हे दाखवत आहे.

सांगायचं झालं  तर, रणवीर याने शोमध्ये आई – वडिलांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे युट्यूबर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून पोलीस याप्ररकरणी पुढील तपास करत आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...