तिने इस्लाम धर्म स्वीकारला असता तर…, महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचं ममता कुलकर्णी वादावर भाष्य
धर्माच्या तथाकथित ठेकेदारांवर निशाणा साधत महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'तिने इस्लाम धर्म स्वीकारला असता तर...', किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर, डॉ.लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी मांडली ममता कुलकर्णीची बाजू

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला काही दिवसांपूर्वी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदी नियुक्त करण्यात आलं होतं. पण अनेक वाद सुरु झाल्यानंतर स्वतः ममता हिने महामंडलेश्वर पदाचा राजीमाना दिला. ममता कुलकर्णी हिने राजीनामा दिल्यानंतर अभिनेत्रीला महामंडलेश्वर पद देणाऱ्या आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी यावर प्रतिक्रिया दिला आहे. शिवाय ममतासोबत मी होती… आहे आणि कायम असणार… ममता किन्नर अखाड्याचा भाग आहे… असं देखील म्हणाल्या.
किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी, अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या बाजून उभ्या असल्याचं दिसून येत आहे. लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाल्या, ‘ममता किन्नर अखाड्याचा एक भाग होती… आहे आणि कायम राहील. ममताने इस्लाम धर्म स्वीकारला असता तर, धर्माच्या तथाकथित ठेकेदारांनी काय केलं असतं? तेव्हा कोणी काहीच बोललं नसतं…
महामंडलेश्वर पदाचा दिला राजीनामा
ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवण्यास मोठा विरोध झाला होता, तर किन्नर आखाड्याच्या आणखी एका महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी यावर प्रश्न उपस्थित करत तिचे डी कंपनीशी असलेले संबंध आणि तुरुंगात जाण्याबाब आक्षेप घेतला.
View this post on Instagram
एवढंच नाही तर, ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, योगगुरू बाबा रामदेव आणि बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देखील अभिनेत्रीला महामंडलेश्वर पदवी दिल्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
सतत होणारा विरोध पाहता सोमवारी स्वतःचं महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला. सोशल मीडियावर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अभिनेत्रीने पदाचा राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा केली. ममता म्हणाली, ‘किन्नर आखाड्यात माझ्यामुळे वाद सुरु आहे. त्यामुळे महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देत आहे. गेल्या 25 वर्षांपासून मी साध्वी आहे आणि राहील…’ असं देखील ममता म्हणाली.
सांगायचं झालं तर, ममता कुलकर्णी हिला 24 जानेवारीला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवण्यात आलं होतं. आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी अभिनेत्रीचं पिंड दान आणि पट्टाभिषेक केला होता. त्यानंतर तिचे नाव श्रीयामाई ममता नंद गिरी असं ठेवण्यात आलं.