‘पद्मावत’ सिनेमात झळकले असते सलमान – ऐश्वार्या, पण अभिनेत्रीने ठेवलेल्या अटीपुढे भाईजान…
Aishwarya Rai - Salman Khan: अनेक वर्षांनतर 'पद्मावत' सिनेमातून एकत्र आले असते सलमान - ऐश्वर्या, भाईजानसोबत काम करण्यासाठी ऐश्वर्याने ठेवलेली एक अट, यावर भाईजानने घेतलेला 'तो' निर्णय आणि..., फार कमी लोकांना माहितेय किस्सा

Aishwarya Rai – Salman Khan: बॉलिवूडचे दिग्गज फिल्म दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी अनेक सिनेमांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरित्या हाताळली आहे. संजय लिला भन्साळी यांच्य पिरियड ड्रामा ‘पद्मावत’ सिनेमाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण झाली आहेत. सिनेमात भन्साळी यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोन, रणवीर सिंग, शाहीद कपूर, अदिती राव हैदरी यांची मुख्य भूमिकेसाठी निवड केली. पण यासर्वांच्या आधी, भन्साळी यांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांनी निवड केली होती.
सांगायचं झालं तर. भन्साळी यांनी ऐश्वर्या – सलमान यांच्यासाठीच ‘पद्मावत’ सिनेमा लिहिला होता. रिपोर्टनुसार, रणवीर याची भूमिका अभिनेता शाहरुख खान याला ऑफर करण्यात आली होती. पण ऐश्वर्या, सलमान आणि शाहरुख यांच्यासोबत भन्साळी यांना सिनेमा पूर्ण करता आला नाही.
सांगायचं झालं तर, ‘हम दिल दे चुके’ सिनेमा हीट ठरल्यानंतर संजय लिला भन्साळी यांनी ‘पद्मावत’ सिनेमाच्या तयारीला सुरुवात केली. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल, ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमासाठी देखील भन्साळी यांची पहिला निवड सलमान – ऐश्वर्या यांच्या जोडीला होती.
पण ब्रेकअपनंतर ऐश्वर्या आणि सलमान खान यांनी कधीच एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. संजय लीला भन्साळी यांनी 2015 साली रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसोबत ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा बनवला, जो सुपरहिट ठरला. त्याचवेळी 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘पद्मावत’ सिनेमासाठी संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंती सलमान-ऐश्वर्या होते.
ऐश्वर्याने सिनेमात काम करण्यासाठी भन्साळी यांना होकार तर दिला. पण अभिनेत्रीने एक अट ठेवली. सिनेमात सलमान याला अलाउद्दीन खिलजी म्हणजे खलनायकाची भूमिका देणार असाल आणि सलमान सोबत एकही सीन देणार नसल्याची अट ऐश्वर्याने घातली होती. तर दुसरीकडे सलमान याला ऐश्वर्यासोबत काम करण्यास कोणतीच अडचण नव्हती.
पण सलमान खान याला ऐश्वर्याची अट मान्य नव्हती. ‘हम दिल दे चुके’ या सिनेमा जशी लवस्टोरी पाहायला मिळाली होती, तीचच लवस्टोरी ‘पद्मावत’मध्ये दिसावी, अशी सलमान खानची इच्छा होती. पण ते काही शक्य झाली. अखेर भन्साळी यांनी दीपिका पादुकोन, रणवीर सिंग, शाहीद कपूर, अदिती राव हैदरी यांच्यासोबत सिनेमा बनवला आणि सिनेमा हीट ठरला.
