
जया बच्चन त्यांच्या अभिनय आणि चित्रपटांपेक्षाही जास्त त्यांच्या रागिट स्वभावामुळे जास्त चर्चेत असतात. पापाराझी, किंवा कोणत्याही चाहत्याला फटकारणं यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहतात. पण 70 ते 80 च्या दशकात जया बच्चन या फक्त चित्रपट आणि अभिनयामुळेच नाही तर त्यांच्या सौंदर्यामुळेही त्या काम चर्चेत असायच्या.
जया बच्चन तिच्या काळातील टॉप हिरोइन्सपैकी एक होत्या. तिने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी सत्यजित रे यांच्या ‘महानगर’ या बंगाली चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या आठ वर्षांनंतर, जयाने हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जया बच्चन तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी देखील प्रसिद्ध आहेत.
जया बच्चन यांचं पहिलं प्रेम माहितीये?
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची लव्हस्टोरी देखील सर्वांना माहित आहे. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न केलं. पण खूप कमी लोकांना हे माहित असेल की जया बच्चन यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर नाही तर दुसऱ्या एका अभिनेत्यावर क्रश होता. त्यांना तो अभिनेता फार आवडायचा. जया बच्चन त्या अभिनेत्याच्या प्रेमात वेड्या होत्या. हा अभिनेता म्हणजे तेव्हाचा सुपरस्टार धर्मेंद्र होते.जया बच्चन यांना धर्मेंद्र इतके आवडायचे की त्यांची पत्नी हेमा मालिनीसमोर देखील धर्मेंद्रवरील तिच्या प्रेमाची कबुलीच दिली होती. जया बच्चन यांनी स्वत: हे सांगितलं. जेव्हा त्या आणि हेमा मालिनी कॉफी विथ करण शोमध्ये एकत्र आल्या होत्या. त्या शोमध्येच जया बच्चन यांनी त्यांना धर्मेंद्र किती आवडायचे याबद्दल थेट हेमा मालिनी यांच्यासमोर सांगून टाकलं होतं.
जया बच्चन या अभिनेत्याच्या प्रचंड प्रेमात होत्या
धर्मेंद्रवरील प्रेमाची कबुली देताना जया बच्चन यांनी त्यांना ग्रीक देव म्हटले होते. त्या म्हणाल्या होत्या, ‘मला बसंतीची (शोलेमधील हेमा मालिनीची व्यक्तिरेखा) भूमिका करायला हवी होती कारण मला धर्मेंद्र खूप आवडायचे. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी इतकी घाबरले की मला काय करावे हेच कळत नव्हते. तिथे एक अतिशय अद्भुत दिसणारा माणूस होता. त्याने पांढरी पँट आणि बूट घातले होते आणि तो अगदी ग्रीक देवासारखा दिसत होता.’
पहिल्या हिंदी चित्रपटात त्याच अभिनेत्रीसोबत काम केलं
1971 मध्ये जया बच्चन यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सेलिब्रिटींचा आणि ग्लॅमरस जगाचा लोकांवर होणारा प्रभाव दाखवण्यात आला आहे. 22 वर्षीय जया बच्चन यांनी गुड्डीची भूमिका साकारली होती, जी एक साधी-भोळी वर्षांची शाळकरी मुलगी होती जी तिच्या पडद्यावरील आदर्श धर्मेंद्रच्या प्रेमात पडते. या चित्रपटात धर्मेंद्र यांचीही खास भूमिका आहे. चित्रपटाप्रमाणेच, जया प्रत्यक्ष जीवनातही धर्मेंद्र यांच्यावर खूप प्रभावित झाल्या होत्या आणि त्यांना ते खूप आवडले होते.
नंतर अमिताभ आणि जया यांची जोडी हीट झाली
मात्र त्यांच्यात नातं काही जुळलं नाही अन् नंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची जोडी जमली आणि हीटही झाली. त्यानंतर जवळपास सर्वच चित्रपटात जया बच्चन आणि अमिताभ यांचीच जोडी दिसली.