AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sejjil Missile : शेवटी ज्याची भीती तेच घडलं, इराणने अखेर ती मिसाईल डागली, एका हल्ल्यात इस्रायल थेट…

इराणने आता इस्रायलवर मोठे हल्ले करायला सुरुवात केली आहे. इराणने एक खास क्षेपणास्त्र समोर आले आहे. याच क्षेपणास्त्राच्या मदतीने इराण इस्रायलला लक्ष्य करत आहे.

Sejjil Missile : शेवटी ज्याची भीती तेच घडलं, इराणने अखेर ती मिसाईल डागली, एका हल्ल्यात इस्रायल थेट...
iran israel warImage Credit source: एक्स
| Updated on: Mar 16, 2026 | 4:33 PM
Share

Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसतो आहे. या युद्धामुळे इराणमध्ये हजारो निरापराध लोकांचा बळी जातोय. यात लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. दुसरीकडे युद्धामुळे जगावर उर्जासंकट निर्माण झाले आहे. भारतात नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी एलपीजी गॅस गॅसची किंमतही वाढली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश मिळून हल्ला करत आहेत. दोन्ही देशांकडून लक्ष्य केले जात असल्याने आता इराण युद्धात पराभूत होणार, असा कयास लावला जात आहे. परंतु आता मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून इराणकडून साधारण ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने इस्त्रायलला लक्ष्य केले जात होते. आता मात्र इराणने आपले एकदम खास आणि संहारक असे क्षेपणास्त्र बाहेर काढले आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये मोठा हाहाकार माजल्याचे बोलले जात आहे.

इराणकडून कोणत्या मिसाईलच्या मदतीने हल्ला?

मिळालेल्या माहितीनुसार इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने आता सेज्जील हे क्षेपणास्त्र वापरण्यास सुरुवात केली आहे. हे क्षेपणास्त्र इराणने थेट इस्रायलवर डागले आहे. इराणचे हे क्षेपणास्त्र डान्सिंग मिसाईल म्हणून ओळखले जाते. या क्षेपणास्त्राने एकदा हल्ला केला की सगळं बेचिराख होऊन जातं, असं सांगितलं जातं. ही एक हाय अल्टिट्यूड मासाईल आहे. या क्षेपणास्त्रात आयरन डोम यासारख्या हवाई संरक्षण प्रणालीला भेदून हल्ला करण्याची क्षमता आहे.

या मिसाईलमध्ये नेमकी किती ताकद

आयआरजीसीच्या दाव्यानुसार इस्रायलच्या तेल अवीव यासारख्या शहरांवर ही मिसाईल अवघ्या सात मिनिटांत हल्ला करू शकते. विशेष म्हणजे ही मासाईल छोट्या पल्ल्याचे रॉकेट, मोर्टार शेल, आर्टिलरी, ड्रोन यांना ही मिसाईल हवेतच नष्ट करू शकते. दरम्यान, इराणच्या या मिसाईलपुढे इस्त्रायलची डिफेन्स सिस्टिम कमकुवत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच इराणने हे शस्त्र बाहेर काढल्यामुळे आता युद्ध लवकरच संपणार आहे, असाही दावा केला जात आहे. परंतु आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच