AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौरभ चौघुलेला घटस्फोट देण्याच्या चर्चांवर योगिता चव्हाणची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..

'जीव माझा गुंतला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी खऱ्या आयुष्यात विभक्त होत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या चर्चांवर योगिता चव्हाणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. योगिता आणि सौरभने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलंय.

सौरभ चौघुलेला घटस्फोट देण्याच्या चर्चांवर योगिता चव्हाणची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..
Yogita Chavan and Saorabh Choughule Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 29, 2025 | 9:06 AM
Share

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत लोकप्रिय ठरलेली जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या खासगी आयुष्याविषयी सध्या बरीच चर्चा होत आहे. लग्नाच्या वर्षभरानंतरच हे दोघं घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांना उधाण येण्यामागचं कारण म्हणजे योगिता आणि सौरभ यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियावरील लग्नाचे फोटोसुद्धा डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर योगिताची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

योगिता आणि सौरभ यांची पहिली भेट ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिकेत एकत्र काम करता करता त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका संपल्यानंतर दोघांनी मार्च 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. आता लग्नाला दीड वर्ष होत नाही तोवर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. ‘न्यूज 18 लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार, योगिताने घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं नसल्याचं तिने सांगितलं आहे. तर याप्रकरणी सौरभशी संपर्क होऊ शकला नाही.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिता चव्हाण नायिका म्हणून झळकली होती. सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतरा या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमध्येही तिचा चांगलाच बोलबाला होता. परंतु हा शो तिने मध्यातच सोडला होता. सातारकर असणाऱ्या योगिताचा जन्म ठाण्यात झाला आहे. नृत्यात करिअर करण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमात ती सहभागी झाली. इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने काम सुरू केलं. तर दुसरीकडे सौरभचा जन्म मालवणमध्ये झाला. त्याने इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. परंतु अभिनयाची प्रचंड आवड असल्याने तो मुंबईत आला. त्याने मॉडेलिंगने करिअरची सुरुवात केली. मॉडेलिंगसोबतच तो विविध नाटकांमध्येही काम करत होता.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?