AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम अद्याप जिवंत आहे का? महिला पत्रकाराकडून गँगस्टरबद्दल 5 मोठी रहस्य उघड

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने अनेक गुन्हे केले आहेत. पण तो अद्याप जिवंत आहे की नाही याबद्दल कोणाला माहिती नाही. 'धुरंधर 2' सिनेमात तो बेडवर पडलेला दाखवण्यात आल्यामुळे त्याच्याबद्दल अधिक चर्चा रंगल्या आहेत.

Dawood Ibrahim :  दाऊद इब्राहिम अद्याप जिवंत आहे का? महिला पत्रकाराकडून गँगस्टरबद्दल 5 मोठी रहस्य उघड
Dawood Ibrahim
| Updated on: Mar 27, 2026 | 9:09 AM
Share

Dawood Ibrahim : एक काळ असा होता जेव्हा फक्त मुंबई नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दहशत होती. अनेक अभिनेत्रीचं नावं देखील दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील गुंडांसोबत जोडण्यात आली. अनेक बॉलिवूड सिनेमे देखील दाऊद इब्राहिम याच्यावर आधारित आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ सिनेमात देखील बडे साहब म्हणून दाऊद इब्राहिम याला दाखवण्यात आलं आलं. ‘धुरंधर’ सिनेमात अनेकदा ‘बडे साहब’ असा उल्लेख करण्यात आला, म्हणून सिनेमाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. सिनेमात दाऊद इब्राहिम याची भूमिका अभिनेता दानिश इक्बाल याने साकारली आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम पुन्हा चर्चेत आला आहे.

अशात नुकताच झालेल्या एका मुलाखततीत सुप्रसिद्ध महिला पत्रकार शीला भट्ट यांनी सुप्रसिद्ध पत्रकार शीला भट्ट यांनी दाऊद इब्राहिम खऱ्या आयुष्यात कसा आहे आणि तो अद्याप जिवंत आहे की नाही… यासोबतच त्याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे. तर जाणून घ्या शिला भट्ट यांनी दाऊद इब्राहिम याच्याबद्दल कोणते मोठे खुलासे केले आहेत.

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये उपस्थित राहिलेल्या शिला भट्ट म्हणाल्या, ‘मी अनेक हिंदी सिनेमे पाहिले आहेत, त्या कोणत्याच सिनेमात दाऊद खरा आहे तसा दाखवण्यात आलेला नाही… खऱ्या आयुष्यात तो एका व्यापाऱ्यासारखा आहे… त्याची भाषा देखील मुंबईतील मरावाडी आणि गुजराती यांच्यासारखी आहे….’

दाऊद इब्राहिम याच्याबद्दल दुसरी गोष्ट सांगत शिला भट्ट म्हणाल्या, ‘दाऊद इब्राहिम याचं डोकं फार नकारात्मक आहे. अभिनेता इमरान हाश्मी याने ‘Once Upon A Time In Mumbai’ या सिनेमामध्ये जी दाऊद याची भूमिका साकारली आहे, ती खऱ्या दाऊदशी मिळती जुळती नाही… कारण जे व्यापारी असतात ते फार समजदार असतात.’

हापूसबद्दल देखील शिला भट्ट म्हणाल्या, ‘दाऊद याला रत्नागिरीच्या हापूस आंब्यांबद्दल फार काही बोलू शकतो… जे क्रिमिनल असतात, त्यांनी बाकीच्या गोष्टी देखील माहिती असतात. दाऊद याने अनेक गुन्हा केले आहे, पण त्याने ट्रेडींग देखील केलं आहे. जवळपास 800 कोटी त्याने तेव्हा कमावले…’

दाऊद याच्या स्वभावाबद्दल देखील शिला भट्ट यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘दाऊद खूप भांडखोर आहे… मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये त्याचा हात नाही… हे सांगण्यासाठी तो माझ्यासोबत चार – चार तास भांडायचा… तो खूप नकारात्मक आहे आणि त्याच्या मनात कायम असुरक्षतेची भावना असते… त्याच्या टोळीतील काही लोक त्याच्या शत्रूला भेटले, त्यामुळे आपली कोणी हत्या करेल… असं त्याला कायम वाटत होतं…’ असं देखील शिला भट्ट म्हणाल्या.

दाऊद इब्राहिम अद्याप जिवंत आहे का?

काही महिन्यांपूर्वी दाऊद इब्राहिम याचं निधन झालं अशा अफवा पसरल्या होत्या. अशात शिला भट्ट यांनी दाऊद इब्राहिम जिंवत आहे की नाही याबद्दल देखील सांगितलं आहे. शिला म्हणाल्या, ‘मुंबईवर त्याची दहशत होती. मी त्याला शेवटचं 1988 मध्ये पाहिलं होतं… माझे काही सोर्स आहेत, ते मला आजही दाऊदबद्दल सांगत असतात… जेव्हा दाऊद इब्राहिम याच्या मृत्यूच्या बातम्या येतात तेव्हा मी माझ्या सूत्रांना नक्की काय सत्य आहे विचारते… त्यामुळे दाऊद अजूनही जिवंत आहे…’ असं म्हणत शिला भट्ट यांनी दाऊद इब्राहिम याची मोठी रहस्य समोर आणली आहेत.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक