जंगलात डोकं अन् पाण्याच्या टाकीत धड…, अभिनेत्रीचा मित्रानेच काढला काटा, कारण थक्क करणारं

Actress Life: सेटवरुन अचानक गायब झालेल्या अभिनेचं जंगलात डोकं अन् पाण्याच्या टाकीत धड, मन सुन्न करणारी घटना, मित्रानेच काढला अभिनेत्रीचा काटा, पण का? फार कमी लोकांना माहिती आहे तेव्हा नक्की काय झालेलं...

जंगलात डोकं अन् पाण्याच्या टाकीत धड..., अभिनेत्रीचा मित्रानेच काढला काटा, कारण थक्क करणारं
फाईल फोटो
| Updated on: Jun 30, 2025 | 11:06 AM

Actress Life: लोक अनेकदा अशा लोकांच्या फसवणुकीला बळी पडतात ज्यांची त्यांना कधीच अपेक्षा नव्हती. बहुतेक प्रकरणांमध्ये, तुमच्या जवळचा कोणीतरी तुमचा विश्वासघात करतो आणि त्यानंतर पश्चाताप होतो. पण वेळ निघून गेलेली असते. असंच काही अभिनेत्री मिनाक्षी थापर हिच्यासोबत झालं आहे. अभिनेत्री सहकलाकारावर विश्वास ठेवला पण त्यानेच अभिनेत्रीचा विश्वास घात केला.

अभिनेत्री मिनाक्षी हिने प्रचंड आनंदी होती, कारण तिला अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत ‘हिरोईन’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मिनाक्षीची ज्यूनियर आर्टिस्ट अमित जैस्वाल याच्यासोबत मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर दोघांमध्ये गप्पा देखील रंगल्या. मिनाक्षीने अमित याला सांगितलं, ती गडगंड श्रीमंत आहे.

मिनाक्षी श्रीमंत असल्यामुळे अमित आणि त्याची गर्लफ्रेंड प्रिती सुरिन यांनी अभिनेत्री विरोधात कट रचला आणि तिला जीवे मारलं. अमित आणि प्रिती यांनी मिनाक्षी हिचं अपहर केलं आणि तिची हत्या केली.

रिपोर्टनुसार, अमित याने मीनाक्षीला तिच्या कुटुंबाच्या मालमत्तेबद्दल बोलताना ऐकले आणि नंतर 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. अमित आणि गर्लफ्रेंड मिनाक्षीच्या आईला धमकी दिली की जर पैसे दिले नाहीत तर मीनाक्षीला घाणेरड्या कामात ढकलले जाईल.

गोरखपूर येथील एका हॉटेलमध्ये अरोपींनी मिनाक्षी हिचा गळा दाबला, त्यानंतर तिचा शिरच्छेद करण्यात आला. अभिनेत्रीचं धड पाण्याच्या टाकीत टाकला आणि मुंबईला जात असताना तिचं डोकं बसमधून बाहेर एका जंगलात फेकला. पोलिसांनी मिनाक्षीच्या फोनचे सिम कार्ड शोधून काढले आणि गुन्हेगारांना पकडले.

ज्यूनियर आर्टिस्ट अमित आणि गर्लफ्रेंड प्रिती यांनी तपासात गुन्हा कबूल केला. 2012 मध्ये मिनाक्षी थापरचे अपहरण आणि हत्येप्रकरणी न्यायालयाने अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन यांना दोषी ठरवलं. न्यायाधीशांनी त्यांना खून आणि खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अभिनेत्री मिनाक्षी थापर हिचा हृदयद्रावक अंत

मिनाक्षी थापरचा जन्म 4 ऑक्टोबर 1984 रोजी डेहराडून येथे झाला. तिने 2011 मध्ये 404 या हॉरर सिनेमातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. ती हिंदी सिनेमांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध होती. पण दुर्दैवाने, 19 एप्रिल 2012 रोजी तिच्या आयुष्याचा दुःखद अंत झाला.